
Fruits/फळं

जे लोक उपवास करतात ते दूध आणि दूधजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात. त्यांमध्ये पनीर , तूप , मलाई, खावा यांचा समावेश आहे. दही आणि दह्यापासून तयार होणारी लस्सी ताक हे देखील बॉडी हाइड्रेटेड ठेवण्यासाठीचे उत्तम पर्याय आहेत.


उपवासादरम्यान शरीरामध्ये पाणी असणे आवश्यक असते. पाणी तुमच्या शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकते. यामुळे तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर या काळात जास्ती जास्त पाण्याचे सेवन करा.

जर उपवास करून तुमचा बारीक होण्याचा उद्देश असेल तर उपवासासोबतच थोडासा व्यायाम देखोल करा त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होईल.