दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे वाढू शकतो दम्याचा त्रास, अटॅक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Diwali : दिवाळीत फटाक्यांचा धूर आणि वाढते वायु प्रदूषण यामुळे दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी अस्थमाचा अटॅक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि दिवाळीचा आनंद घेताना स्वतःचे आरोग्य कसे जपावे, जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स.

दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे वाढू शकतो दम्याचा त्रास, अटॅक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 4:45 PM

दिवाळी म्हटली की रोषणाई, फटाके आणि आनंदाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. मात्र या उत्सवाच्या काळात फटाक्यांमधून निघणारा धूर आणि हानिकारक रसायने हवेत मिसळल्याने प्रदूषणाची पातळी वाढते. याचा परिणाम विशेषतः दम्याच्या रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो. प्रदूषित हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे आणि दम्याचा त्रास वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवाळीचा आनंद घेताना अस्थमाच्या रुग्णांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्या उपायांनी या काळात आरोग्य जपता येईल, ते जाणून घेऊया.

इनहेलर सोबत ठेवा
दिवाळीत फटाके फोडल्याने वायू प्रदूषण वाढते. अशा परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अस्थमाच्या अटॅकपासून सुरक्षित राहण्यासाठी दिवाळीच्या दिवसात तुमचे इनहेलर आणि औषध नेहमी सोबत ठेवणे चांगले असते.

Loading...

व्यायाम करा
दम्याच्या रुग्णांसाठी ब्रीदिंग एक्सरसाइज चांगले मानले जातात. दम्याचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही दररोज फुफ्फुस मजबूत करणारे श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि योगा, प्राणायामची मदत घेऊ शकता. हे फुफ्फुस मजबूत करण्यास मदत करू शकतात.

मास्क वापरा
दिवाळीच्या सुमारास घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावा. असे केल्याने वातावरणातील धूळ आणि घाण तसेच फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरापासून सुरक्षित राहता येतं.

कामाशिवाय घराबाहेर पडू नका
दिवाळीच्या दिवशी अस्थमाचे रुग्ण प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवू शकतात. घराबाहेर पडतानाही चेहऱ्यावर मास्क घालण्याचा प्रयत्न करा. शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.

चांगले खा
दिवाळी हा दिवे आणि फटाक्यांचा तसेच मिठाईचा सण आहे. पण दम्याच्या रुग्णांनी आर्टिफिशियल स्वीटनर आणि मिठाईचे सेवन टाळावे. याशिवाय आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सकस आहार घ्यावा.

हायड्रेटेड राहा
दम्याचे रुग्ण कोमट पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्यांसह अनेक प्रकारचे त्रासदायक घटक लवकर बाहेर काढू शकतात. तसेच पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ते हायड्रेट राहते.

फटाके न फोडण्याचा प्रयत्न करा
फटाके फोडल्याने कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर ऑक्साईड सारखे वायू बाहेर पडतात, जे दमा रुग्णांसाठी धोकादायक असतात. त्यामुळे शक्यतो कुटूंबियांसोबत फटाके फोडण्याचे टाळा.

दुग्धजन्य पदार्थ खाऊ नका
दम्याच्या रुग्णांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. हे दुग्धजन्य पदार्थ फुफ्फुसातील श्लेष्माची निर्मिती वाढवून दम्याच्या रुग्णांच्या समस्या आणखी वाढवू शकतात.

(डिस्क्लेमर: बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us