AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: वारंवार बदलणारे तापमान ‘उष्णतेच्या लाटे’ पेक्षा धोकादायक, मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांना सर्वाधिक धोका

गेल्या काही आठवड्यात दिल्लीच्या काही भागात तापमान 49 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्या तुलनेत शहरातील इतर काही भागात जेथे हिरवळ आहे, तेथे तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे.

Health: वारंवार बदलणारे तापमान 'उष्णतेच्या लाटे' पेक्षा धोकादायक, मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांना सर्वाधिक धोका
वारंवार बदलणारे तापमान 'उष्णतेच्या लाटे' पेक्षा धोकादायकImage Credit source: Twitter
| Updated on: May 22, 2022 | 6:07 PM
Share

वारंवार बदलत्या वातावरणाचा नागरिकांवर वाईट परिणाम होत असून, याबाबत ‘अर्बन हीट आयलंड’ नावाच्या घटनेचा उल्लेख नुकताच नासाने ट्विटमध्ये केला आहे. त्यात फरक अधोरेखित केला. तापमानात किंचित घट झाल्यानेही दिलासा मिळत असला तरी प्रचंड उष्मा (Extreme heat) आणि तापमानातील चढउतार यामुळे नुकसान होत असल्याचे राजधानीतील डॉक्टरांनी सांगितले आहे. नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे सहाय्यक प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉ. सुमोल रत्ना यांनी सांगीतले की, “गेल्या काही आठवड्यांपासून तापमानातील चढउतार शरीरासाठी खूप धोकादायक (Too dangerous) आहेत. शरीराला बाह्य उष्णतेशी जुळवून घेण्याची आंतरिक क्षमता असते. ही क्षमता वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगळी असते. काही समायोजित करू शकतात आणि काही करू शकत नाहीत. व्यक्तींमध्ये, हे अपंगत्व कमी प्रतिकारशक्ती (Low immunity), इतर अनेक रोग आणि अगदी वयाशी संबंधित असू शकते. याचा अर्थ असा होतो की वृद्ध आणि तरुण लोक शरीराचे तापमान बाह्य तापमानाशी जुळवून घेण्यास खूपच कमकुवत असतात.

कमी प्रतिकारशक्ती म्हणजे कमी अनुकूलता

डॉ. रत्ना म्हणाल्या, ज्या लोकांना बीपी, मधुमेह आणि श्वसनाचे आजार आहेत त्यांची उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असते. उष्णतेमुळे आणि तापमानातील चढउतारामुळे अशा रुग्णांमध्ये सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त लक्षणे दिसून येतात. या लोकांमध्ये ताप, विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दी, श्वास लागणे आणि बीपीमध्ये वाढ दिसून येते. ऍलर्जीक ब्राँकायटिस आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह देखील सामान्यतः दिसून येतो, विशेषतः मुलांमध्ये. शरीराची अनुकूलता ही प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. कमी प्रतिकारशक्ती म्हणजे कमी अनुकूलता.

काय म्हणतो रिसर्च

द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार 2000 ते 2019 या काळात अस्थिर तापमानामुळे दरवर्षी सरासरी 17.5 लाख मृत्यू झाले. एमसीसी कोलॅबोरेटिव्ह रिसर्च नेटवर्कमधील डेटाचा वापर करणाऱ्या या अभ्यासात 43 देशांमधील 750 ठिकाणी तापमान परिवर्तनशीलता आणि मृत्युदर यांच्यातील संबंध शोधण्यात आला. 2000 ते 2019 दरम्यान जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 3.4 टक्के तापमानातील बदलांचा वाटा होता. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये मृत्यूदर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

तापमानातील बदलामुळे मृत्यू होऊ शकतो

शरीराचे अंतर्गत तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाइटच्या आसपास राहते. बाह्य तापमान हायपोथालेमसद्वारे जाणवते, मेंदूचा एक भाग जो शरीराच्या अनेक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. डॉ रत्ना म्हणाल्या, ‘जेव्हा बाहेरचे तापमान वाढते, तेव्हा मेंदूच्या या भागाला त्याची जाणीव होते आणि जेव्हा ते खूप गरम असते तेव्हा व्यक्तीला घाम येऊ लागतो. शरीराला घाम येत नसेल तर शरीराचे अंतर्गत तापमान वाढते. शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे नसेल तर उष्माघाताचा धोका वाढतो ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.

थायरॉईड च्या रुग्णांनाही धोका

राजधानीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध विभागाचे डॉ. राजीव गुप्ता यांनी सांगितले की हायपरथायरॉईडीझमने ग्रस्त असलेल्या लोकांना अति उष्णतेमध्ये अस्वस्थ वाटते. डॉ गुप्ता म्हणाले, ‘हायपरथायरॉईडीझममध्ये शरीरातील तापमान वाढते. उन्हाळ्यात अशा लोकांना धडधडणे, घाम येणे आणि गरम वाटणे अशी लक्षणे दिसतात. उच्च सभोवतालचे तापमान या समस्या आणखी वाढवते. ‘थायरॉईड संप्रेरक बेसल मेटाबॉलिक रेट वाढवते ज्यामुळे थर्मोजेनेसिस वाढते – ज्यामुळे शरीरात अधिक उष्णता निर्माण होते. हे थेट थायरॉईड पातळीशी जोडलेले आहे. थायरॉईडची पातळी (स्तर) जितकी जास्त असेल तितकी जास्त उष्णता निर्माण होईल.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.