AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या

डायबिटीज असणाऱ्यांसाठी फळांचा संपूर्ण आणि नैसर्गिक स्वरूपात (साल व गूदा सहित) समावेश अधिक फायदेशीर ठरतो. फळांचा रस ही एक गोड वाटणारी, पण आरोग्यास धोका ठरू शकणारी निवड असू शकते. त्यामुळे तुम्ही डायबिटिक असाल, तर रोजच्या आहारात काय समाविष्ट करावं आणि काय टाळावं, हे एकदा नक्की वाचा...

डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या
मधुमेहला हरवाImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 2:28 PM
Share

डायबिटीज म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात कोणते अन्नपदार्थ घेणे योग्य आहे आणि कोणते टाळावेत, याचे भान ठेवणे फार गरजेचे असते. कारण चुकीची आहाराची निवड केवळ आरोग्यावरच नव्हे तर थेट रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम करू शकते. याच पार्श्वभूमीवर सध्या एक मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे फळ खाणं अधिक योग्य की फळांचा रस पिणं?

साधारणतः फळे ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज, फायबर, विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. फायबरमुळे पचनक्रिया संथ होते, ज्यामुळे साखर शरीरात हळूहळू शोषली जाते. त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढत नाही. तसेच फळे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, जे ओव्हरईटिंगपासून रोखते.

मग फळांचा रस का नाही योग्य?

फळांचा रस काढताना त्यातील फायबरचा भाग म्हणजे गूदा आणि साल वेगळे केले जाते. त्यामुळे त्यात फायबर जवळपास शून्य होतो. अशा रसायनशून्य रसामध्ये साखरेची मात्रा खूप जास्त असते आणि ती शरीरात झपाट्याने शोषली जाते, जे ब्लड शुगर वाढवते. शिवाय, एक गिलास रस बनवण्यासाठी २-३ फळांचा वापर केला जातो, त्यामुळे त्यातील कॅलरी इन्टेक जास्त होतो. ही सर्व कारणं मिळून डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी रस हे चांगले पर्याय ठरत नाहीत.

योग्य फळांची निवड महत्त्वाची

सर्व फळे डायबिटिक व्यक्तींना फायदेशीर असतीलच असे नाही. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) यावर आधारित फळांची निवड केली पाहिजे. कमी GI असलेली फळे म्हणजे, सफरचंद, नाशपती, संत्री, जामुन, कीवी, अमरूद ही फळे हळूहळू साखर रक्तात मिसळतात आणि त्यामुळे शुगर नियंत्रणात राहते.

तर दुसरीकडे, आंबा, केळी, चीकू, द्राक्षे यांसारख्या फळांचा GI जास्त असल्यामुळे ती रक्तातील साखर लवकर वाढवू शकतात. म्हणूनच अशा फळांचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.

साबुत फळ खाणे ही रसाच्या तुलनेत चांगली सवय असली तरी त्याचेही प्रमाण ठरवूनच घेतले पाहिजे. खूप जास्त फळे एकत्र खाल्ल्यास त्यातून मिळणारी साखर एकदम वाढू शकते. त्यामुळे आहारात फळे समाविष्ट करताना पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.