Side Effects Of Ghee | आरोग्याच्या या समस्या आहेत?, तर तुपापासून चार हात दूरच राहा!

मस्त गरमा गरम वरण आणि भातावर तूप (Ghee) टाकून खाण्याची मजाच वेगळी आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तूप खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स शरीराला फायदेशीर (Beneficial) ठरतात आणि या कारणास्तव आरोग्य तज्ञ देखील ते खाण्याचा सल्ला देतात. तूप नेहमीच जेवणाची चव वाढवण्याचे काम करते.

Side Effects Of Ghee | आरोग्याच्या या समस्या आहेत?, तर तुपापासून चार हात दूरच राहा!
तूप खाताना या गोष्टींचा विचार करा.
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 10:29 AM

मुंबई : मस्त गरमा गरम वरण आणि भातावर तूप (Ghee) टाकून खाण्याची मजाच वेगळी आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तूप खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स शरीराला फायदेशीर (Beneficial) ठरतात आणि या कारणास्तव आरोग्य तज्ञ देखील ते खाण्याचा सल्ला देतात. तूप नेहमीच जेवणाची चव वाढवण्याचे काम करते. यामुळे बाराही महिने आपण तूप आहारामध्ये (Diet) घेऊ शकतो. तूपामध्ये ओमेगा 3, ओमेगा 9, फॅटी अॅसिड आणि अनेक व्हिटॅमिन असतात. मात्र, ज्याप्रमाणे तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्याचप्रमाणे तूप खाण्याचे अनेक तोटेही आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

खराब कोलेस्टेरॉल

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्यास आपला आहार जबाबदार असतो. योग्य आहाराअभावी शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागतात. यामुळे कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका कायम असतो. तुपातील फॅटमुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते तूप खाण्याच्या अगोदर तोडासा विचार नक्कीच करायला हवा.

सर्दी आणि खोकला

ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे. त्यांनी तुपापासून चार हात लांबच राहिला हवे. तज्ज्ञांच्या मते, या समस्येच्या वेळी तूप खाल्ल्याने घशातील स्निग्धता वाढू शकते आणि तुम्हाला तीव्र खोकल्याची तक्रार होऊ शकते. जर आपल्याला खूपच जास्त तूप आवडत असेल तर कमी प्रमाणात खा सर्दी आणि खोकला असल्यावर.

फॅटी लिव्हर

यकृताचे आरोग्य ठीक नसेल तर तेलकट पदार्थ खाऊ नयेत. आजच्या काळात बहुतेक लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे. फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या व्यक्तीला हलक्या आणि कमी तेलकट पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना ही समस्या आहे, त्यांना तूपाचे अजिबातच सेवन करू नये.

(वरील माहिती सामान्य ज्ञानांवर आधारित आहे, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

Skin | मसूर डाळीमध्ये हे घटक मिक्स करून फेसपॅक तयार करा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

Hair Care | पातळ आणि निर्जीव केसांना निरोगी बनवण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा!