Health: या दोन गोष्टीच्या एकत्रित सेवनाने वाढते रोग प्रतिकारक शक्ती, आजारही राहतात दूर

कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.

Health: या दोन गोष्टीच्या एकत्रित सेवनाने वाढते रोग प्रतिकारक शक्ती, आजारही राहतात दूर
रोग प्रतिकारक शक्ती Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 6:57 PM

मुंबई, कोरोनानंतर अनेकांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य जपण्यासाठी रोग प्रतिकारक (Immunity Power) शक्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या भारतीय आहारात असे बरेच घटक आहेत जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत.  पालक आणि मुगडाळ (Spinach and Mugdal) हे देखील त्यापैकीच एक आहे. जर तुम्ही मूग किंवा मसूर डाळ आणि पालकाची भाजी खात असाल तर हा ऊर्जेचा (Energy source) एक उत्तम स्रोत आहे. याच्या एक वाटी भाजीमध्ये 132 कॅलरीज मिळतात. ज्यामध्ये 76 कॅलरीज कार्बोहायड्रेट आणि 29 कॅलरीज प्रोटीन व 27 कॅलरीज फॅट आहेत.

त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात मूग डाळ आणि पालकाचा समावेश केला पाहिजे. मुगाची डाळ जवळपास प्रत्येक घरात रोज तयार केली जाते. पण त्यात पालक टाकून बनवल्यास त्याची चव तर वाढतेच शिवाय पौष्टिकताही वाढते. जाणून घ्या मूग डाळ आणि पालक खाण्याचे फायदे.

मूग डाळ आणि पालकाचे फायदे

  1. पचनशक्ती मजबूत होते – मूग डाळ आणि पालक हे फार जड अन्न नसल्यामुळे पचायला सोपे आहे. यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. याशिवाय शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर करते.
  2. हाडे मजबूत होतात-  मूग डाळ आणि पालकाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. लहान मुलांपासून ते वृद्धांसाठी याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त- मूग डाळ आणि पालकमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. कॅल्शियम आणि प्रथिनांचाही हा एक चांगला स्रोत मानला जातो. ते शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
  5.  

    त्वचेसाठीही आरोग्यदायी- पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्तीसोबतच मूग डाळ आणि पालक त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहेत. याच्या वापराने चेहऱ्याचा रंग निखरतो. यासोबतच चेहऱ्यावरील तारुण्य टिपिक आणि वृद्धत्वाची समस्याही दूर होते. मूग डाळ आणि पालकाच्या सेवनाने शरीरासोबतच त्वचाही निरोगी राहते.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.