घरीच करा रक्त तपासणी, ‘हे’ अ‍ॅप्स करतील तुमची मदत

तुम्हाला बॉडी चेकअप करून घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्हाला पूर्ण बॉडी चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी अ‍ॅप्सच्या माध्यमातून बुकिंग करून तुम्ही तुमची टेस्ट करून घेऊ शकता.

घरीच करा रक्त तपासणी, ‘हे’ अ‍ॅप्स करतील तुमची मदत
Blood test App
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 11, 2025 | 6:45 PM

AI चं हे युग आहे. देशात तंत्रज्ञान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे लोकांची जीवनशैलीही सोपी होत चालली आहे. तुम्ही आता एक क्लिकवर काहीही करू शकतात. दूरध्वनीपासून फोनपर्यंतचा प्रवास असो किंवा सायकल ते विमान, सर्वांनी माणसाला दिलासा दिला आहे. आता जर तुम्ही किंवा तुमचे कुटुंब आजारी पडले तर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज नाही. ना पॅथॉलॉजीच्या रांगेत उभं राहावं लागेल ना जॅममध्ये ढकलून लॅबपर्यंत पोहोचण्याची स्पर्धाही होणार नाही. घरबसल्या तुमची तपासणी केली जाईल. आरोग्य तपासणीसाठी कुठेही जायची गरज नाही. हे काम तुम्ही काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून घरबसल्या करून घेऊ शकता.

रक्त तपासणी, साखर, बीपी तपासण्यासाठी पॅथॉलॉजीमध्ये जाण्याची गरज नाही. बाजारात असे काही अ‍ॅप्स आहेत, जे तुम्हाला घरबसल्या हेल्थ चेकअपची सुविधा देतात. अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सर्व अ‍ॅप्स डाऊनलोड करू शकता आणि बुकिंग करण्यापूर्वी सर्व अ‍ॅप्समधील टेस्टच्या किंमतीची तुलना करू शकता.

डॉ. लाल पॅथलॅब

डॉ. लाल पॅथलॅब ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी पॅथॉलॉजी लॅब आहे. याची स्थापना 1949 मध्ये डॉ. एस. के. लाल यांनी केली. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या बुकिंग आणि चेक करू शकता. बुकिंग केल्यानंतर टीम तुमच्या घरी येऊन नमुने घेईल. त्यानंतर अहवाल तुमच्याकडे पाठवला जाईल.

हेल्थियन्स

हेल्थियन्स ही आणखी एक अग्रगण्य पॅथॉलॉजी लॅब आहे जी देशभरात आपली सेवा प्रदान करते. दीपक शहा यांनी 2015 मध्ये याची स्थापना केली. यामाध्यमातून घरबसल्या आरोग्य तपासणी ही करता येणार आहे. सर्व चेकअप फी पाहून तुम्ही स्वत:नुसार निर्णय घेऊ शकता.

रेडक्लिफ लैब्स

रॅडक्लिफ लॅब्स ही पॅथॉलॉजी लॅब आहे. जी देशभरात आपली सेवा पुरवते. याची स्थापना 2017 मध्ये दिनेश चौधरी यांनी केली. या लॅबच्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन हेल्थ चेकअपसाठी बुकिंग करू शकता आणि आपली टेस्ट करून घेऊ शकता.

हे वरील अ‍ॅप्स तुम्हाला घरबसल्या हेल्थ चेकअपची सुविधा देत आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही घरी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्ही हे सर्व अ‍ॅप्स डाऊनलोड करू शकता आणि बुकिंग करण्यापूर्वी सर्व अ‍ॅप्समधील टेस्टच्या किंमतीची तुलना देखील करू शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)