तुमच्याही पायाचे तळवे नेहमी असतात का गरम ? व्हा सावध, या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

काही लोकांच्या पायाचे तळवे सतत गरम असतात, मात्र त्याकडे कोणी विशेष लक्ष देते नाही. पण याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, कारण ते एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

तुमच्याही पायाचे तळवे नेहमी असतात का गरम ? व्हा सावध, या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण
Image Credit source: freepik
| Updated on: Sep 19, 2023 | 3:54 PM

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : मानवी शरीरातील सर्वात महत्वपूर्ण अवयव म्हणजे यकृत अर्था लिव्हर (liver) . लिव्हर खूप महत्वाचे असते कारण ते प्रथिने, कोलेस्ट्रॉल आणि हार्मोन्ससह अनेक गोष्टी तयार करते. तसेच शरीरातील घाण काढून टाकण्याचे कामही लिव्हर करते. अन्न पचविण्याचे कामही लिव्हरद्वारे केले जाते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे लिव्हर खराब (liver problem ) झाले तर संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण लिव्हर हा आपल्या शरीरातील इतका महत्त्वाचा अवयव आहे की जेव्हा कोणत्याही रोगाचा व्यक्तीवर हल्ला होतो तेव्हा लिव्हर स्वतःच त्याच्यावरचा उपाय शोधतो. पण त्यावर जास्त दबाव पडला तर त्याचे काम हळूहळू थांबते. लिव्हर खराब होण्याची चिन्हे हळूहळू शरीरावर दिसू लागतात.

अनेक व्यक्तींच्या पायाचे तळवे सतत गरम असतात. पण त्याकडे नीट लक्ष दिले जात नाही. मात्र तुमचेही पाय, तळवे गरम रहात असतील त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते लिव्हर फेल होण्याचे संकेत असू शकतात. लिव्हर खराब होण्याचे संकेत पहिले पायांच्या तळव्यावर दिसतात. ते संकेत कोणते हे जाणून घेऊया.

तळव्यांना खाज सुटणे

जर तुमच्या तळव्यांना वारंवार खाज सुटत असेल तर ते हलक्यात घेऊ नये, कारण तो तुमचे लिव्हर धोक्यात असल्याचा संकेत असू शकतो. विशेषत: तळव्याच्या खालच्या भागात खूप खाज येत असेल तर ते लिव्हर खराब झाल्याचे लक्षण असू शकते.

तळव्यांवर सूज येणे आणि वेदना

अनेक लोकांच्या पायाचा खालच्या भागाला बरेचवेळेस सूज येते किंवा वेदना होतात. पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे लिव्हर डॅमेज होण्याचे सुरूवातीचे संकेत असू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाला खूप दुर्गंधी येत असेल तर हे देखील यकृत खराब होण्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते.

पाय नेहमी गरम असणे किंवा पायांच्या खालच्या भागात सतत उष्णता जाणवणे हे देखील लिव्हरच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जेव्हा लिव्हर योग्यरित्या रक्त स्वच्छ करू शकत नाही, तेव्हा तळवे गरम होतात.

पायाच्या नखांना इन्फेक्शन

पायाच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होणे हे लिव्हर खराब होण्याचे प्राथमिक लक्षण असू शकते.

पायाची नख पांढरी पडणे

आपल्या पायाची नखं पांढरी पडणं हे देखील लिव्हर डॅमेजचे सुरूवातीचे संकेत आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)