
भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. हायब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल आणि तणावपूर्ण लाईफस्टाईलमुळे लोकांच्या हृदयाचे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अजूनही तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलवर लक्ष दिले नाही तर येत्या वर्षात हृदयाचे आजार आणखीन वाढतील. वेळेच संकेत ओळखून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तरच या सायलेंट किलरपासून आपण वाचू शकतो.
भारतात हार्ट अटॅक मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान देशात हार्ट अटॅक प्रकरणात सुमारे ५० टक्के वाढ पाहायला मिळत आहे. शहरीकरण, बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, तणाव, ध्रुमपान आणि डायबिटीश सारखे आजार याची मुख्य कारणे आहेत. हा आजार केवळ आरोग्यापुरता मर्यादित नाही. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था, कुटुंबाचे स्थैर्य आणि कामकाजावर परिणाम होत आहे.
हृदयाला रक्त पुरवणाऱ्या आर्टरीजमधील रक्ताचा प्रवाह गुठळी आणि किंवा ब्लॉकेजमुळे रोखला जातो, त्यामुळे हृदयाच्या स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोहचत नाही. काही वेळाने पेशी मरतात. जर वेळीच उपचार मिळाले नाही तर प्राणही जाऊ शकतात. बहुतांश हार्ट अटॅक हे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर अचानक होत नाहीत. त्याचा रिस्क फॅक्ट आधीच आपल्या शरीरात उपस्थित असतात. उदा. हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, लठ्ठपणा आणि धुम्रपान असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बहुतांशी लोकांना पहिला हार्ट अटॅक अचानक येत नाही. त्याच्यामागे काही सायलेंट रिस्क फॅक्टर लपलेले असते.
हायब्लड प्रेशर – बराच काळ असलेले हायब्लड प्रेशर धमन्यांच्या भित्तींना नुकसान पोहचवते.
कोलेस्ट्रॉल – रक्तात वाढलेले LDL कोलेस्ट्रॉल आर्टरीजमध्ये फॅटी डिपॉझिट बनवत असतो,त्यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो.
ब्लड शुगर वा डायबिटीज– वाढलेली शुगर रक्ताच्या पेशींना कमजोर करते आणि हार्ट डिसीजचा धोका अनेक पटींनी वाढतो.
स्मोकिंग – तंबाखू हार्ट आणि आर्टरीज दोन्हींना नुकसान पोहचवत असतो.
हे सर्व फॅक्टर हळूहळू परिणाम करत असतात. परंतू लक्षण तेव्हा दिसतात जेव्हा धोका वाढलेला असतो. यामुळे नियमित तपासणी करायला हवी.
बहुतांशी जोखमीला नियंत्रित केले जाऊ शकते. योग्य खानपान, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय तपासणी हार्ट अटॅकचा धोका बराच कमी केला जाऊ शकतो. यासाठी तुमच्या डाएटमध्ये सुधारणा करा. व्यायाम करा, रोज किमान ३० मिनिटे चाला. ध्रुमपान सोडा, तंबाखू सेवन बंद करा यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. आपल्या आरोग्याची तपासणी आणि काळजी न घेतल्याने बहुतांशी स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येतात.जर वेळीच तपासणी केली तर डॉक्टर सुरुवातीलाच उपचार सुरु होऊ शकतो. ३० वयाच्या वरील व्यक्तींनी कुटुंबात हार्ट डिसीजचा रेकॉर्ड असेल तर नियमित तपासणी करावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.