Heart Health : डोके शांत असेल तर हृदय देखील चांगले राहते, या सवयी अंगी बाणवा

आपले मानसिक आरोग्य आपल्या शारीरिक आरोग्याशी निगडीत आहे,अगदी तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा संबंध तुमच्या मेंदू मन आणि विचारांशी असतो. गेल्या काही वर्षांत केलेल्या अनेक अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की मानसिक आरोग्या बिघडल्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

Heart Health : डोके शांत असेल तर हृदय देखील चांगले राहते, या सवयी अंगी बाणवा
Heart Health
| Updated on: Sep 28, 2025 | 10:10 PM

भारतात एक म्हण प्रसिद्ध आहे चिंता ही चिता समान असते. ही म्हण आरोग्य आणि विज्ञानावर आधारलेली वाटते.चिंता म्हणजे Anxiety, आजकाल प्रत्येकजण तणाव आणि चिंतेखाली आहे. मग तो कामाचा दबाव असो की आर्थिक तंगी वा व्यक्तिगत आव्हाने. आपल्या मनाचे विचारचक्र सतत धावत असते. थोडीबहुत चिंता असणे योग्य आहे. परंतू सतत होत असलेली चिंता आपल्या मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर मोठा परिणाम करते. खास करुन आपल्या हृदयावर याचा वाईट परिणाम होत असतो. या त्यामुळे मेंटल हेल्थला गांभीर्याने घ्यायला हवे.

काय म्हणतात वैज्ञानिक

अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या मते तणाव आणि चिंता ही हृदयाच्या आजाराची अप्रत्यक्ष कारणे आहेत.त्यामुळे तुमच्या मनाला शांत करण्याबरोबरच हृदयाचे संरक्षण करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.यात एक प्रकार माईंडफूलनेस आहे.ध्यान लावण्याची ही जुनी पद्धस्थ,चिंता कमी करणे आणि एकूणच आरोग्यात सुधारणा आणते.

हृदयाला आरोग्यादायी राखण्यासाठी माईंडफुलनेस टीप्स

आपण आपल्या रोजच्या जीवनात माईंडफुलनेसला केस समाविष्ठ करु शकतो. याचे काही सोपे उपाय पाहा

1. खोल श्वास घ्या

खोल श्वास घेणे माइंडफुलनेसचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपायांपैकी एक आहे. चिंता करत असताना आपला श्वास हळू किंवा जोरजोरात होतो.त्यामुळे हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढत असते. आपल्या श्वासाला सावकाश केल्याने शरीराचा ‘रेस्ट एण्ड डायजेस्ट’ रिस्पॉन्स सक्रीय होतो.

यासाठी आधी आरामात बसा, आपले डोळे बंद करा आणि १ ते ४ आकडे मोजत नाकाने खोल श्वास घ्या. एक क्षणासाठी थांबा आणि पुन्हा १ ते ६ आकडे मोजत हळूहळू तोंडाने श्वास बाहेर काढा. ही क्रिया पाच मिनिटे पुन्हा पुन्हा करत रहा. ज्यावेळी आपल्याला चिंता वाटत असेल त्यावेळी ही क्रिया करा. ही क्रिया काही काळाने तुमच्या मनाला शांत करेल. आणि तुमच्या हृदय प्रणालीला तणावाशी सामना करायला मदत करेल.

2. बॉडी स्कॅनचा अभ्यास करा

तुम्ही कधी विचार केला आहे का चिंता शारीरिक रुपाने कशी प्रकट होते. खांद्याचा तणाव, जबडा कसणे आणि हृदयाची ठोके वाढणे याची सामान्य लक्षणे आहेत. बॉडी स्कॅन ध्यानाने आपल्याला या तणावाला ओळखणे आणि त्याला दूर करण्यास मदत करते.

सर्वात आधी बसण्यासाठी एक शांत जागा निवडा. हळू-हळू आपले लक्ष डोक्यापासून पायापर्यंत आणा. कोणत्याही ताणाशिवाय श्वास न सोडल्यानंतर तो तणाव समाप्त झाल्याची कल्पना करा. जे या तंत्राचा अभ्यास करतात त्यांच्या नुसार याने झोपेची समस्या देखील दूर होते. आणि हृदयावरील तणाव देखील दूर होतो.

3. माईंडफुल वॉक करा

जर एका जागी तुम्हाला ध्यान लावून बसणे अवघड वाटत असेल तर माईंडफूल वॉक करण्याचा चांगला पर्याय होऊ शकतो. त्याचा अभ्यास तुम्हाला फिजिकल एक्टीव्हीटी ( शारीरीक हालचाली ) आणि माईंडफुलनेस प्रॅक्टीस दोन्ही लाभ एकसाथ होऊ शकतात.
यासाठी तुम्ही शांत वातावरणात १ ० ते १५ मिनिटे पायी चाला. आपल्या पावलांची लय, जमीनीवर पायांचा स्पर्श होण्याचा अनुभूती आणि आजूबाजूच्या आवाजांवर लक्ष द्या. जर तुमचे मन सैरवैर भटकू लागले तर आपले लक्ष पुन्हा आपल्या चालण्याच्या क्रियेवर केंद्रीत करावे. हा व्यायाम केवळ तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला नसून तुमचे मान शांत करण्याचा चांगला उपाय आहे.