ब्रेन स्ट्रोक येण्याआधी एक दिवस आधी शरीर देते हे संकेत, दुलर्क्ष केल्यास येतो अटॅक
ब्रेन स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात, या आजाराचे संकेत शरीर काही तास आधी देत असते. एक दिवस आधी आपल्या शरीरास या आजाराचे संकेत मिळत असतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा मोठा हानिकारक झटका येण्याआधी त्याची लक्षणे ओळखणे गरजेचे असते

Brain Stroke:
मेंदूच्या नसांमध्ये रक्तप्रवाह करणाऱ्या नसांना दुखापत झाली किंवा त्या फुटल्या तर आपल्याला पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक येत असतो. त्यामुळे शरीराचे अवयव लुळे होऊ शकतात. किंवा दृष्टी, बोलणे वा चालणे अथवा ऐकणे अशा क्रियांवर परिणाम होऊन त्या बंद देखील पडू शकतात. किंवा मेंदूत अधिक रक्तस्राव झाला तर मृत्यू देखील येऊ शकतो..
जेव्हा मेंदूची एखादी नस ब्लॉक होते तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. या जीवघेण्या स्थिती वेळीच उपचार न केल्यास मृत्यू देखील येऊ शकतो.परंतू तुम्हाला मिनी ब्रेन स्ट्रोक बद्दल माहिती आहे का? जो एखाद्या मोठ्या अटॅक येण्याआधीच येऊ शकतो.याची लक्षणं हलकी असतात. त्यांना वेळीच ओळखले तर मोठा अटॅक येण्यापासून वाचता येते. याला मिनी ब्रेन स्ट्रोक वा ट्रान्सिएंट इस्केमिक अटॅक देखील म्हणतात
ब्रेन स्ट्रोक ज्याला पक्षाघात देखील म्हणतात. या आजाराचे संकेत शरीर काही तास आधी देत असते. एक दिवस आधी आपल्या संकेत मिळतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा मोठा झटका येण्याआधी उपचार सुरु केल्यास रुग्णाला वाचवता येते.
केव्हा येतो स्ट्रोक
ब्रेन स्ट्रोक सारखा छोटा ब्रेन अटॅक देखील मेंदूची एखादी नस ब्लॉक झाल्याने येऊ शकतो. NHS (ref.) च्या नुसार याचे कारण मेंदूला ऑक्सीजन मिळणे बंद होते. परंतू हे नुकसान स्थायी नसते. आणि २४ तासात आपोआप बरे देखील होत असते. परंतू याच्या लक्षणांना गंभीरतेने घ्यायला हवे आणि डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेणे गरजेचे असते.
मिनी ब्रेन स्ट्रोकच्या लक्षणांवर नजर ठेवा
शरीराच्या एका बाजूला चेहरा किंवा हात वा पायात सुन्नपणा येणे किंवा अशक्तपणा येणे
अचानक भ्रम होणे
अचानक बोलण्यात अडचणी येणे
अचानक दिसयला त्रास किंवा अडचण येणे
अचानक तोल जाणे
अचानक चालताना अडचण येणे
चक्कर येणे
स्ट्रोकपासून वाचण्यासाठी डाएट
ब्रेन स्ट्रोक पासून वाचण्यासाठी कमी चरबी असलेले, कमी मीठ आणि अधिक फायबर असलेला आहार घ्यावा, ज्यासाठी तुमच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करु शकता.
पेअर
स्ट्रॉबेरी
एव्हाकॅडो
सफरचंद
केळे
गाजर
बीट
( डिस्क्लेमर – ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांना भेटा )
