भारत तयार करणार एचआयव्हीवरील सर्वात स्वस्त औषध, ३५ लाखाऐवजी इतक्या रुपयांना मिळणार
भारत सरकार आधीपासूनच एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार मोहीम राबवत आहे. रुग्णांना मोफत चाचणी, समुपदेशन आणि औषधे दिली जात असतात. २०३० पर्यंत देशातून एचआयव्ही/एड्स पूर्णपणे उच्चाटन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

HIV drug India: भारत एचआयव्ही सारख्या दुर्धर आजारावर स्वस्तातले औषध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात एचआयव्ही (ह्यूमन इम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस-एड्स) सारख्या आजारात वापरले जाणारे औषध आता भारतात सर्वात स्वस्तात उपलब्ध होणार आहे. हे औषध अमेरिकेत जवळपास ३५ लाख रुपयांना मिळते ते आता भारतात केवळ ३,३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. चला तर पाहूयात हे औषध इतके स्वस्त कसे मिळणार ते…
गरीब आणि विकसनशील देशांचा सर्वात मोठा फायदा
हे नवीन औषध बाजारात आल्याने सर्वात लाभ गरीब आणि विकसनशील देशातील रुग्णांना होणार आहे. या देशांमध्ये हे महागडे औषध खरेदी करणे अवघड झाले होते. त्यामुळे या गरीब राष्ट्रामधील लोकांसाठी हे औषध जीवन रक्षक सिद्ध होणार आहे. भारत आधीपासूनच जेनेरिक औषधाचे उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठे केंद्र आहे. आणि आता एचआयव्हीचे हे औषध तयार करुन भारत आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे.
काय आहे विशेष ?
अमेरिका, कनाडा, यूरोप आणि ऑस्ट्रेलियात आधीच उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधाचे हे जेनेरिक व्हर्जन असणार आहे. ब्रँडेड औषधांची किंमत इतकी जादा आहे की सामान्य रुग्णांना त्यास खरेदी करणे देखील अशक्य आहे. परंतू भारतात तयार होणाऱ्या जेनेरिक व्हर्जनमुळे याची किंमत इतकी कमी झाली आहे.त्यामुळे गरुजूंना हे औषध उपलब्ध करणे शक्य होणार आहे.
केव्हा मिळणार हे औषध ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे औषध बाजारात साल २०२७ मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. या स्वस्त औषधांना हजारो लोकांना नवीन जीवन मिळणार आहे. आणि एड्स विरोधात सुरु असलेल्या जागतिक लढ्याला आणखी मजबूती मिळणार आहे.
भारतात एचआईव्हीची स्थिती
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे २५.४ लाख लोक एचआयव्हीने संक्रमित आहेत. यातील दरवर्षी सुमारे ६८ हजार लोक नवीन रुग्ण म्हणून दाखल होतात. तसेच २०२३-२४ मध्ये देशात सुमारे ३५,८७० जणांचा एचआयव्ही संबंधित आजारांनी मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरुन भारतात एचआयव्ही आजही आरोग्यासाठी मोठे आव्हान बनलेला आहे.
