AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणनंतर आता कोणाचा नंबर? डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टार्गेट ठरले

 इराणची लष्करी ताकद संपवल्यानंतर आता अमेरिकेचे पुढचे लक्ष्य क्युबा असेल, असे खळबळजनक विधान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. इराणच्या २४ युद्धनौका नष्ट केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

इराणनंतर आता कोणाचा नंबर? डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टार्गेट ठरले
trump
| Updated on: Mar 06, 2026 | 8:21 AM
Share

सध्या इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक राजकारणात खळबळ उडवून देणारे एक मोठे विधान केले आहे. आमचे पहिले प्राधान्य इराणसोबत सुरू असलेला संघर्ष यशस्वीपणे संपवणे हे आहे, पण हा विषय मार्गी लागल्यानंतर अमेरिका आपले पूर्ण लक्ष क्युबाकडे वळवेल,” असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये इंटर मियामी सीएफ (Inter Miami CF) फुटबॉल क्लबच्या विजयानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईबाबत प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला आहे. अमेरिका आणि इस्रायल ठरवलेल्या वेळापत्रकापेक्षा कितीतरी वेगाने इराणची लष्करी ताकद नष्ट करत आहेत. गेल्या ७२ तासात अमेरिकेने इराणच्या २४ युद्धनौका समुद्रात बुडवल्या आहेत. यामुळे इराणचे नौदल आता पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत आले आहे. त्यासोबतच इराणचे हवाई दल जवळपास निकामी झाले आहे. त्यामुळे त्यांचे लढाऊ विमान ताफा आता उडण्याच्या स्थितीत नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

इराणकडून सतत वाटाघाटीचा प्रस्ताव

इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आता पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. ज्यामुळे अमेरिकन विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय इराणच्या आकाशात वावरू शकतात. इराणला आता कळून चुकले आहे की ते अमेरिकेसमोर टिकू शकत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडून सातत्याने करारासाठी संदेश येत आहेत. ते आता युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार आहे. मात्र, जोपर्यंत अमेरिकेच्या अटी पूर्ण होत नाहीत आणि त्यावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत ही मोहीम थांबणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

पुढचं टार्गेट कोण?

इराणचा लष्करी अध्याय संपल्यानंतर ट्रम्प सरकार त्यांचा मोर्चा क्युबाकडे वळणार आहे. मियामीमध्ये क्युबन-अमेरिकन समुदायाची मोठी उपस्थिती लक्षात घेता ट्रम्प यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. क्युबा सध्या अमेरिकेशी तडजोड करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे त्यांना टार्गेट करण्यास आता फार वेळ लागणार नाही. भविष्यात क्युबाचे अनेक रहिवासी, जे सध्या निर्वासित म्हणून अमेरिकेत आहेत, ते सन्मानाने आपल्या मायदेशी परतताना दिसू शकतील, असे ट्रम्प यांनी म्हटले.

दरम्यान ट्रम्प यांच्या या मिशन वर्ल्ड पीस आणि आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता ट्रम्प सरकार इराणनंतर क्युबाबाबत नेमकी काय पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!