AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नंसी कंट्रोल करणाऱ्या औषधाने स्ट्रोकचा धोका, महिलांवर कसा होतो परिणाम ?

भारतासह जगभरातील महिला गर्भनिरोधकांचा वापर करतात, ज्यांना कंबाईंड हार्मोनल कॉन्ट्रोसेप्टीव्ह म्हणजे सीएचसी देखील म्हणतात, ज्यात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टीन दोन्ही असतात.

प्रेग्नंसी कंट्रोल करणाऱ्या औषधाने स्ट्रोकचा धोका, महिलांवर कसा होतो परिणाम ?
birth controll pill
| Updated on: Sep 26, 2025 | 10:43 PM
Share

प्रेग्नंसी रोखण्यासाठी जगभरात महिला गर्भनिरोधकांचा वापर करत असतात. तसेच  मेंस्ट्रुअल सायकलला मॅनेज करण्यासाठी Contraceptive औषधांचा वापर सर्रास होत असतो. परंतू द कन्वर्सेशन’ च्या एका अहवालानुसार नव्या संशोधनात बर्थ कंट्रोल पिल्सशी संलग्न धोके उघड केले आहेत. खास करुन क्रिप्टोजेनिक इस्केमिक स्ट्रोक (Cryptogenic ischaemic stroke) चा धोका हायलाईट केला आहे. जो एक प्रकारचा अचानक येणारा स्ट्रोक असून त्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

कॉन्ट्रासेप्टिव्सने स्ट्रोकचा धोका ?

यूरोपीयन स्ट्रोक ऑर्गनायझेशन परिषदेत सादर केलेल्या सीक्रेटो स्टडीनुसार असे उघड झाले आहे की ओरल कॉन्ट्रासेप्टीवचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये न वापरणाऱ्या महिलांपेक्षा क्रिप्टोजेनिक स्ट्रोकचा अनुभव येण्याची शक्यता तीन पट जास्त होती. लठ्ठपणा आणि मायग्रेनसारख्या अनेक रिस्क फॅक्टरना लक्षात घेतल्यानंतरही हे सत्य उघड झाले आहे. अधिक अभ्यासात एस्ट्रोजन कंटेनिंग कॉन्ट्रासेप्टीव्ह सारख्या गोळ्या, पॅच, आययूडी आणि व्हजाईन रिंगसोबत देखील रिस्क वाढली आहे. वजाईनल रिंगमुळे स्ट्रोकच्या धोक्याला २.४ पट वाढवले आहे, कॉन्ट्रासेप्टीव पॅचने ३.५ पट, तर केवळ प्रोजेस्टीनवाल्या आययूडीने कोणताही अतिरिक्त रिस्क दाखवला नाही.

काय जबाबदार ?

याचा दोष सिंथेटिक एस्ट्रोजन अपीयर असते. नॅचरल एस्ट्रोजनच्या उलट सिंथेटिक व्हर्जेंस जास्त पॉवरफूल असतात आणि त्यांचा डोस नियमित असतो. हा लिव्हरला गुठळ्या बनवणारे प्रोटीन तयार करण्यास प्रेरित करतो. आणि गुठळ्या विरोधी औषधांचा परिणाम कमी करतो,त्यामुळे एन्बॉर्मल ब्लड क्लॉटची स्थिती तयार होते. या गुठळ्या ब्रेनच्या नसात रुकावट तयार करू शकतात. ज्यामुळे इस्केमिक स्ट्रोक होऊ शकतो. एस्ट्रोजन रक्तदाबाला थोडा वाढवू शकतो आणि रक्ताच्या धमन्यांचे काम बाधित करु शकतो. सिगारेट पिणारे, मायग्रेनने पिडीत लोक वा रक्ताच्या गुठळ्याचा आजार असणाऱ्या लोकांमध्ये ही जोखीम आणखीन वाढू शकते.

असा संबंध असूनही एकूणच धोका कमी असतो, दरवर्षी ४,७०० गोळ्या घेणाऱ्यांमागे अंदाजे एक अतिरिक्त स्ट्रोक येऊ शकतो. तरीही, जगभरात लाखो महिला सीएचसी वापर करत आहेत. यामुळे छोटी जोखीमही मोठ्या लोकसंख्येवर मोठा परिमाण करु शकते. महत्त्वाचे म्हणजे, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरच्या काळात रक्त गोठण्याचा आणि स्ट्रोकचा धोका गर्भनिरोधकांच्या तुलनेत जास्त असतो, जो एक दृष्टीकोन प्रदान करतो.

अधिक अभ्यासाची गरज

हे प्रकरण महिलांशी संबंधित आरोग्य संशोधनातील मोठ्या त्रूटी उघड करते. जेथे कॉन्ट्रासेप्टिव्सच्या साईड इफेक्टचाही कमी अभ्यास झाला आहे. आणि त्यांच्या संबंधी माहिती कमी झाली आहे.सर्व गर्भनिरोधक उपायांचे धोके आणि फायदे यांची पाहणी करण्यासाठी अचूक, पारदर्शक माहितीची आवश्यकता असते. सुधारित संशोधन आणि संवादामुळे महिलांना योग्य निवड करू शकतात आणि प्रभावीपणा, प्रवेश योग्यता आणि सुरक्षितता यांचे सर्वोत्तम संतुलन साधणारे उपाय निवडू शकतात.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.