AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 06 March 2026 : अरे देवा ! युद्धाच्या भडक्याने सोनंही होरपळलं.. आजचा भाव किती ?

Gold-Silver Rate Today 06 March 2026 Latest News Updates in Marathi: काल MCX वर झालेल्या किरकोळ घसरणीनंतर, आज सोने आणि चांदीच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. आज 6 मार्च रोजी देशभरात सोन्याचे दर किती ते जाणून घेऊया .

Gold-Silver Rate Today 06 March 2026 : अरे देवा ! युद्धाच्या भडक्याने सोनंही होरपळलं.. आजचा भाव किती ?
6 मार्च रोजी सोन्याचे दर किती ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 06, 2026 | 10:18 AM
Share

Gold and Silver Rates on 6 March 2026 Updates : मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे, तणावामुळे जगभरात अशांतता असून त्याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारातही दिसत आहे. दोन्ही धातूंच्या किमतीत सातत्याने चढउतार होत असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तिन्ही देशांच्या संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार आणि कमोडिटी बाजारांची धडधड वाढली आहे. युद्धाच्या या आवाजात, गुंतवणूकदार त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा त्याच जुन्या आणि विश्वासार्ह ठिकाणाकडे वळले आहेत, ज्याला ‘सेफ-हेवन’ म्हणजेच सोनं म्हणतात. याचाच परिणाम म्हणजे आज, 6 मार्च 2026 रोजी दिसून आला असून सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

सोन्या-चांदीचे दर किती ? 

काल MCX वर झालेल्या किरकोळ घसरणीनंतर, आज मात्र सोनं-चांदीच्या दरांनी उसळी मारली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9 वाजेपर्यंत,सोन्याच्या भावात 1302 रुपयांची वाढ झाली. या मोठ्या वाढीसह, 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीने 1 लाख 60 , 950 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे चांदीचीही तीच हालत असून त्यात आणखी मोठी वाढ दिसून आली आहे. चांदी तर सोन्यापेक्षाही वेगाने वाढत आहे. चांदीच्या किमती 5631 रुपयांनी वाढून 2 लाख 67 हजार 822 रुपये प्रति किलो या दरांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे,ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का, असा प्रश्न सोने आणि चांदी खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या मनात आहे. युद्धाच्या आगीत सोने-चांदी अधिक महाग होईल की त्याची चमक कमी होईल आणि येत्या काळात सोने-चांदी स्वस्त होईल?

परदेशी बाजारपेठेतही खळबळ

मात्र या दोन धातूंच्या दरातील तेजी केवळ भारतीय बाजारपेठेपुरती मर्यादित नाही. सुरुवातीच्या आशियाई बाजारपेठांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही सोन्याची चमक वाढली आहे. जागतिक COMEX वर आज सोन्याने 1.16 टक्क्यांनी वाढ झाली आणि प्रति औंस 5,137.70 डॉलर्सचा जादुई टप्पा ओलांडला. चांदीही यात मागे नाही; त्यात 2.27 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे, जी प्रति औंस 84.06 डॉलर्सवर व्यवहार करत आहे. सोन्याची जागतिक मागणी सध्या शिखरावर आहे हेच परदेशी बाजारपेठेतील या कलावरन स्पष्ट होतं.

कालच मिळाला होता दिलासा

सराफा बाजाराचा हा सध्याचा ट्रेंड आणखी धक्कादायक आहे कारण एक दिवस आधीच, म्हणजे गुरुवारी, चित्र पूर्णपणे उलट होते. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, काल सराफा बाजारात जोरदार विक्री झाली. 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,962 रुपयांनी घसरून 1,60,586 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोने 1,47,097 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,20,440 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं गेले. काल चांदीला सर्वात मोठा फटका बसला, एका दिवसात 7,135 रुपयांनी प्रति किलोग्रॅम घसरण झाली आणि ती 2,64,212 रुपयांवर बंद झाली. काल एमसीएक्सवर सोने 0.15% आणि चांदी 0.12% ने घसरून बंद झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...