झोपेची कमतरता मेंदूसाठी दारुपेक्षाही खतरनाक, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
चांगली झोप हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. तज्ज्ञ या संदर्भात नेहमीच सांगत असतात की पुरेशी झोप माणसासाठी गरजेची असते. झोपेच्या अभावी अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

अलिकडे झालेल्या संशोधनानूसार झोपेची कमतरता मेंदूवर मद्याच्या प्रभावाप्रमाणे काम करते असे उघड झाले आहे. सातत्याने झोपे कमी मिळाल्याने आपली एकाग्रता नष्ट होत असते. माणसाची स्मृती देखील कमी होते आणि मूडमध्ये लागोपाठ बदल होत राहातो. झोपेच्या कमतरतेचा परिणाम हा अस्थायी नसतो तर कायम स्वरुपी असतो. उदाहरणार्थ मद्य पिल्याने मेंदू अस्थायी रुपाने सुन्न होतो.परंतू अपुऱ्या झोपेचे परीणाम दीर्घकालीन रुपाने शरीरावर निगेटिव्ह इफेक्ट करीत राहतात. लागोपाट कमी झोपणाऱ्या लोकांची हळूहळू मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी होत जाते.
झोपेचा संपूर्ण मेंदूवर होणारा परिणाम
झोपेच्या कमतरतेचा परिणाम दारु सारखा शरीरावर दिसू लागतो. रात्री नीट झोप न झाल्याने व्यक्तीला सातत्याने थकवा, मानसिक भ्रम आणि आळस येत राहतो.याशिवाय झोप न घेतल्याने मेंदूच्या पेशींचे कार्य देखील प्रभावित होऊ शकते. तज्ज्ञाच्या मते झोप न मिळाल्याने त्याचा परिणाम शरीरावर बराच काळ होत रहातो. झोपेच्या कमतरतेने शरीर आणि मेंदू हळूहळू कमजोर होऊ लागतो. तर मद्याचा परिणाम सर्वसाधारणपणे अस्थायी स्वरुपाचा असतो.
मेंदूला सुरक्षित कसे ठेवाल?
झोपेच्या कमीमुळे अनेक गंभीर त्रास सुरु होतात. त्यांना कमी करण्यासाठी काही उपाय देखील आहेत. तज्ज्ञांच्या मते रात्री ठराविक एकाच वेळेवर झोपणे आणि सकाळी ठराविक एकाच वेळी उठण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शरीराचे जैविक घड्याळ योग्य होते. रोज किमान ७ तास झोपण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे शरीर आणि मेंदूला योग्य आराम मिळेल आणि मेंदूच्या पेशी योग्य प्रकारे काम करतील. शरीराला सवय लावण्यासाठी रात्री ९ ते सकाळी ४ पर्यंत झोपण्याची वेळ ठरवा. ही वेळ मेंदू आणि शरीरासाठी योग्य मानली जाते. तज्ज्ञाच्या मते झोपेला प्राथमिकता दिल्याने केवळ थकवा दूर होत नाही तर मेंदू आणि शरीर बराच काळ कार्यरत रहाण्यासाठी हे मदतगार ठरते. चांगली झोप घेणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. तज्ज्ञ या संदर्भात नेहमीच सल्ला देत असतात की पुरेशी झोप माणसासाठी का गरजेची असते. झोपेच्या अभावी अनेक आजारांना आमंत्रण मिळत असते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
