
नवी दिल्ली : दिल्लीसह भारतातील अनेक भागात तापमानात (increasing temperature) सातत्याने वाढ होत आहे. कडक उन्हात अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. यापैकी एक आजार म्हणजे उष्माघात. ज्याला हीट स्ट्रोक (heat stroke) असेही म्हटले जाते. उन्हाळ्यात (hot summer) हा आजार सर्रास होतो, परंतु वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याचा धोकाही संभवतो. तसेच त्यामुळे अवयव निकामी होण्याचा धोका आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, उष्माघात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे तुमचे शरीर जास्त गरम होते. उष्णतेच्या थेट संपर्कात आल्यामुळे, आपलं शरीर निर्धारित मानकांनुसार स्वतःला थंड ठेवण्यास सक्षम रहात नाही.
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, येत्या काही महिन्यांत उष्माघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. हवामानातील बदल आणि उष्णता वाढल्यामुळे हे घडते. परंतु तुमच्या शरीरातून जेवढी उष्णता बाहेर पडते त्यापेक्षा जास्त उष्णता शोषून घेत असल्यास, तुमचे आंतरिक लक्षणीय वाढते, ज्यामुळे उष्माघात होतो. उष्माघातामुळे घाम न येण्याची समस्याही वाढते. शरीरातून घाम येणे बंद होते.
उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर शरीरातील मीठ आणि पाणी कमी झाल्यामुळे स्नायूंमध्ये पेटके किंवा गोळा येतो. बहुतेकवेळेस हात, पोटऱ्या आणि पायांमध्ये हा त्रास होतो. काही वेळा हा त्रास अचानक थांबतो, पण वेदनांची लक्षणे अनेकदा 24 ते 48 तास टिकतात. यापेक्षा जास्त काळ ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण अनेक बाबतीत उष्माघाताने गंभीर आजारही होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, उष्माघात होताच, रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.
ही आहेत उष्माघाताची लक्षणे
– सौम्य ताप येणे
– तहान लागणे
– उलटी होणे
– थकवा, अशक्तपणा जाणवे
– स्नायूंमध्ये वेदना होणे
– लघवी न लागणे
– काही प्रकरणांमध्ये बीपीही वाढू शकते.
बचावासाठी उपाय
– उन्हात बाहेर जाताना डोकं झाकून ठेवावे
– गार वातावरणातून अचानक बाहेर गरम वातावरणात येऊ नये.
– दिवसभरात थोड्या- थोड्या वेळाने पुरेसे पाणी पित रहावे.
– उष्माघाताचात्रास होत असेल तर डोक्यावर गार पाणी ओतावे
– आसपास हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी