AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त साखरेमुळे मधुमेह होत नाही, तर या पदार्थांमुळे वाढते रक्तातील साखर, जाणून आश्चर्य वाटले

साखर ही किती हानिकारक असते हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नसते. पण अनेकांना असे वाटते की फक्त साखर खाल्ल्याने मधुमेह होतो. पण तसं नाहीये. असे कित्येक पदार्थ आहेत ज्यात सारखेचं प्रमाण जास्त असतं. आणि त्या पदार्थांतून ही साखर आपण नकळत घेत असतो. जाणून घेऊयात की नक्की कोणत्या पदार्थांमुळे मधुमेह होण्याचा धोका असतो.

फक्त साखरेमुळे मधुमेह होत नाही, तर या पदार्थांमुळे वाढते रक्तातील साखर, जाणून आश्चर्य वाटले
Hidden Sugar, Foods That Spike Blood Sugar & Increase Diabetes RiskImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 7:02 PM
Share

सध्याची आपली जीवनशैली पाहता अनेक आजारांमुळे लोकं त्रस्त आहेत. नियमित झोप नाही, जेवणाची वेळ निश्चित नाही, तसेच धकाधकीच्या वेळापत्रकामुळे व्यायाम तर होतच नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे अनेक प्रकारचे आजारांना निमंत्रण. त्यात आता एक आजार तर झपाट्याने वाढत चालला आहे. तो म्हणजे मधुमेह. पण लोकांना वाटते की जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे मधुमेह होतो मात्र साखर अनेक आजार वाढवण्यास मदत करते हे जरी खरे असले तरी आजकालची लाईफस्टाईल आणि असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे मधुमेह होतो आणि लवकर लक्षातही येत नाही.

साखरेव्यतिरिक्त कोणत्या पदार्थात साखर असते?

साखरेमुळे केवळ मधुमेहच नाही तर लठ्ठपणा, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या देखील होतात. म्हणून, कोणत्या गोष्टींमध्ये साखर असते हे माहित असणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की या गोष्टींचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोल्ड्रिंक्स पिण्याची आवड असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की 300 मिली सॉफ्ट ड्रिंकमध्ये31.8 ग्रॅम साखर आणि 132 कॅलरीज असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. त्याचप्रमाणे, चॉकलेट पेस्ट्री सर्वांनाच पसंत असतात. ते खाण्यास जितके चवदार आहे तितकेच ते आरोग्यासाठी देखील हानिकारक असतात. कारण त्यात 12 ग्रॅम साखर आणि 297 कॅलरीज असतात. दुसरीकडे, फ्लेवर्ड ज्यूसमध्ये 46.8 ग्रॅम साखर आणि 189 कॅलरीज असतात आणि चॉकलेटमध्ये 25 ग्रॅम साखर आणि 100 किलो कॅलरीज असतात. त्याचप्रमाणे, एका गुलाब जामुनमध्ये 32 ग्रॅम साखर आणि 254 किलो कॅलरीज असतात.

प्रक्रिया केलेल्या अन्नातही साखर

यावरून आपण समजू शकतो की आपण दैनंदिन आहारात किती मोठ्या प्रमाणात लपलेली साखर नकळक खात असतो. अशा परिस्थितीत, एखाद्या गोष्टीचे सेवन केल्याने आपल्या शरीरात किती साखर जाते हे जाणून घेणे महत्वाचे बनते. भारतात साखर आणि साखरयुक्त पेयांच्या वाढत्या वापरामुळे लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दशकांत भारतात खाण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. जागतिकीकरणामुळे, पूर्वीच्या तुलनेत आज साखरयुक्त पदार्थ आणि पेये सहज उपलब्ध झाली आहेत. पारंपारिक मिठाईंसोबतच, थंड पेये आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर देखील वाढला आहे, जो आरोग्यासाठी धोकादायक बनला आहे.

साखरेऐवजी काय खावे?

जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात साखरेचे सेवन सुज्ञपणे केले तर तुम्ही मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग यासारखे गंभीर आरोग्य धोके टाळू शकता. साखरेचे सेवन नियंत्रित करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, तुमच्या दैनंदिन आहारातील पदार्थांतील साखरेचे प्रमाण तपासा आणि लेबल्स वाचा. सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी, लिंबूपाणी किंवा फळांचा रस (साखरशिवाय) प्या. दररोज व्यायाम करा. तसेच आपण आपल्या आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.