Health : कमजोर हृदय असणाऱ्यांच्या शरीरात ही लक्षणे दिसून येतात, जाणून घ्या!

जेव्हाही हृदयविकाराची समस्या निर्माण होत असते तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसत असतात. बहुतेक लोकांना ही लक्षणे माहीत नसतात. तर आता आपण हृदयविकाराशी संबंधित लक्षणे कोणकोणती आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : कमजोर हृदय असणाऱ्यांच्या शरीरात ही लक्षणे दिसून येतात, जाणून घ्या!
heart friendly fruits
| Updated on: Oct 01, 2023 | 11:07 PM

मुंबई : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि या धावपळीच्या जगात आपल्याला अनेक वेगवेगळे आजार निर्माण होताना दिसतात. त्यात बहुतेक लोकांना हृदयाशी संबंधित आजार होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. बाहेरचे पदार्थ अति प्रमाणात खाणे, शरीराची हालचाल न करणे, व्यायाम न करणे, टेन्शन, ताणतणाव अशा अनेक गोष्टींमुळे हृदयाशी संबंधित आजार निर्माण होतात. तसेच लठ्ठपणा, ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो अशावेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

जर तुमच्या छातीत दुखत असेल किंवा छातीवर दबाव आल्यासारखं वाटत असेल, तसेच तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून योग्य तो उपचार घ्यावा. कारण ही हृदयविकाराची लक्षणे असतात. जर तुमच्या छातीवर दबाव पडल्यासारखं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यात घेण्यास त्रास होत असेल तर तुमचे हृदय कमकुवत असू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घ्या.

बहुतेक लोकांना बीपी चा त्रास असतो. जेव्हाही तुमचा बीपी वाढतो तेव्हा ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. बीपी वाढल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी तुमचा बीपी चेक करत रहा आणि डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घ्या.

तुमच्या छातीत जर दुखत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. छातीत दुखणे किंवा छातीत जळजळ होत असेल तर तुमचे हृदय कमकुवत असू शकते. तसेच जर तुम्हाला छातीत खूप जास्त दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घ्या.

जर तुम्हाला अचानक खूप जास्त घाम येत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. तुम्हाला खूप जास्त घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या निर्माण होत असतील तर ते हृदयविकाराचे लक्षणे असू शकतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.