होमिओपॅथी म्हणजे रोग नाही रोगाचे कारणच नष्ठ करते; काय आहे ही औषध पद्धत जाणून घ्या

| Updated on: Mar 23, 2022 | 6:35 PM

जगभरातील कोट्यवधींपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत. अॅलोपॅथी हे रोगांचे निदान, चाचणी आणि उपचार पद्धतीत ही सगळ्यात विश्वासार्ह गोष्ट असली तरी होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर तो रोग मुळापासून नष्ठ करण्यासाठी विश्वासार्ह मानला जातो.

होमिओपॅथी म्हणजे रोग नाही रोगाचे कारणच नष्ठ करते; काय आहे ही औषध पद्धत जाणून घ्या
Medicine
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः होमिओपॅथीचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या डॉ.सॅम्युअल हॅनेमन (Dr. Samuel Hahnemann) यांचा जन्म 1755 मध्ये जर्मनमध्ये झाला. डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांनी होमिओपॅथीच्या (Homeopathy) रुपात अशी काही औषध पद्धत विकसित केली की, जी शरीराच्या एकाच भागावर किंवा त्याच रोगावर उपचार करण्यासाठी वापरली जाते. आज जगभरात कोट्यवधी नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेऊन त्याची उपचार पद्धत घेतात. अ‍ॅलोपॅथीद्वारे (Allopathy) रोगांचे निदान करणे, चाचणी आणि उपचार करुन घेणे म्हणजे सर्वात विश्वासार्ह गोष्ट मानली जाते.

आजही होमिओपॅथी म्हणजे हा रोग दाबून टाकणे होत नाही तर एकाद्या रोगाला मुळापासून दूर करण्यासाठी होमिओपॅथी विश्वासू गोष्ट मानली जाते. आज आम्ही तुम्हाला होमिओपॅथी का अंगीकारली पाहिजे आणि त्याचे काही महत्त्वाचे फायदे काय आहेत ते सांगू.

होमिओपॅथी म्हणजे दुष्परिणामांची चिंता नाही

औषधांमध्ये होमिओपॅधी ही सगळ्यात सुरक्षित प्रणाली मानली जाते, कारण त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. इंग्रजी वैद्यकशास्त्रात कोणत्याही रोगावर जर उपचार घेतला, त्यासाठी औषधं घेतली गेली तर त्याचे काही दुष्परिणाम हे होतातच. कोणत्याही रुग्णाने जर क्षयरोगावर उपचार घेतले तर त्याचा दुष्परिणाम म्हणजे त्याचा त्याचवेळी यकृतावर नकारात्मक परिणाम होतो. मायग्रेनसाठी जर तुम्ही सतत औषध घेतला तर त्याचा दुष्परिणाम म्हणजे ते रक्त पातळ करते. शरीरातील कोणत्याही वेदनेसाठी आपण जी पेनकिलर घेतो, पण ती घेत असलेली पेनकिलर ही शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करत असते. मात्र होमिओपॅथीच्या बाबतीत असे होत नाही, आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. होमिओपॅथी हे औषध ज्या आजारावर घेता तोच आजार ते बरे करते, दुसऱ्या कशावर त्याचा परिणाम होत नाही.

होमिओपॅथिक औषधे व्यसनासारखी नसतात

व्यसनाप्रमाणे असणारी इंग्रजी औषधांसारखी होमिओपॅथिक औषधे ही व्यसनासारखी नसतात, अशी अनेक इंग्रजी औषधे आहेत जी दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शरीर त्याच औषधांवर पूर्णपणे अवलंबून होते. त्यामुळे कधी औषध न घेतल्यास अनेक दुष्परिणाम होतात. पण होमिओपॅथिक औषधांच्या बाबतीत असे होत नाही. दीर्घकाळ सेवन करूनही शरीराला त्यांची सवय लागत नाही.

गर्भवती महिला, वृद्धांसाठी पूर्णपणे सुरक्षित

काही औषधं ही रुग्णांच्या स्वभावावरही परिणाम करतात. होमिओपॅथिक औषधे मुळातच मूळ गुणधर्म ठेऊन तयार केली जात असल्याने त्याचा परिणाम मानवाच्या स्वभावावर होत नाही. त्यामुळे गर्भवती महिला, लहान मुले, आणि अगदी वृद्धांसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे या औषधांचा शरीरावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही.

मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त

मधुमेहामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी इंग्रजी औषधे विपरित परिणाम करु शकतात. त्यामुळे जे कोणी मधूमेही रुग्ण असतील त्यांना सर्व प्रकारची औषधी देऊ शकत नाही. मात्र होमिओपॅथिक औषधांचे तसे नसते. ही औषधे मधुमेही रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित असतात.

औषधे पूर्णपणे सुरक्षित

होमिओपॅथिक औषधे लॅक्टोज असलेल्या लोकांसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहेत. ते होमिओपॅथीची औषधेही आत्मविश्वासाने घेऊ शकतात. त्यांचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

संबंधित बातम्या

कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले जाणार? केंद्रीय गृह सचिवांचे राज्यांना पत्र

Aurangabad | महापालिका उभारतेय 3 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 30 कोटी रुपयांचा निधी, लवकरच प्रस्ताव

Hemorrhoids : मूळव्याधाच्या त्रासामुळे त्रस्त आहात? मग जाणून मूळव्याध म्हणजे नेमके काय आणि मूळव्याधाचे प्रकार!