AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | महापालिका उभारतेय 3 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 30 कोटी रुपयांचा निधी, लवकरच प्रस्ताव

या तीनपैकी सर्वात मोठे 60 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेडकर नगर येथे उभे राहील, अशी योजना आखण्यात आली आहे. तसेच इतर दोन रुग्णालयांचीही तरतूद कऱण्यात आली असून त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. ही माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

Aurangabad | महापालिका उभारतेय 3 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 30 कोटी रुपयांचा निधी, लवकरच प्रस्ताव
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 23, 2022 | 11:56 AM
Share

औरंगाबादः कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेवरील ताण बहुतांश प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad municipal Corporation) चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन हॉस्पिटल (Meltron Hospital) येथे ओपीडी सेवा सुरु केली. भविष्यात या ठिकाणी संसर्गजन्य आजारांवरील रुग्णसेवा दिली जाईल, त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तीन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची (multi specialty hospital) उभारणी करण्यात येत आहे. शहरात महापालिकेची पाच रुग्णालये आणि 34 आरोग्य केंद्र आहेत. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर सुविधांचा अभाव आहे. आता मात्र महापालिकेकडून आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहे.

दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकचा अभ्यास

दिल्लीत ज्या पद्धतीने दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाते, त्या पद्धतीनेच औरंगाबादमध्ये सेवा मिळावी, म्हणून प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार 30 कोटी रुपयांचा निधी वापरून शहरात तीन मल्टिस्पेशालिटी रुग्णालये सुरु करण्यात येतील. तसेच शहरातील आरोग्य केंद्र अद्ययावत करण्याचे कामही लवकरच सुरु होईल, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

60 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

दरम्यान, या तीनपैकी सर्वात मोठे 60 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेडकर नगर येथे उभे राहील, अशी योजना आखण्यात आली आहे. तसेच इतर दोन रुग्णालयांचीही तरतूद कऱण्यात आली असून त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. ही माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

आरोग्य केंद्रांची सद्यस्थिती काय?

शहरात महापालिकेची पाच रुग्णालये आणि 34 आरोग्य केंद्र आहेत. मात्र किरकोळ जखमी झालेला रुग्ण आरोग्य केंद्रात गेला तरीही त्याला दोन टाके देण्यासाठीचा आधुनिक धागा महापालिकेकडे नाही. कुत्रा चावल्यावर देण्यात येणारे इंजेक्शन घेण्यासाठीदेखील घाटी रुग्णालयात जावे लागते. राज्य आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना राबवण्याचे एकमेव काम सध्या आरोग्य विभागाकडून सुरु आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी चाचपणी

दरम्यान, राज्यातील काही मोठ्या महापालिकांनी यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालय सुरु केले आहेत. औरंगाबाद महापालिकेचेदेखील अशाच प्रकारे एक स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असायला हवे, त्या दृष्टीनेही प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय महालिद्यालयांसाठी किमान 800 खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे. मनपाकडे सध्या 350 बेडचे स्वतंत्र मेल्ट्रॉन हॉस्पिटल आहे.

इतर बातम्या-

तर तो माझा शेवटचा क्षण असेल, धनंजय मुंडेंच्या आरोपांवर pankaja munde यांचा पलटवार

zomato बॅायला 10 मिनीटात delivery द्यायला लावण धोक्याचं, रोहित पवारांचा नव्या निर्णयाला विरोध

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.