
उन्हाळा आता सुरू झाला असून त्याच्या झळा सर्वांना बसत आहेत. तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. उन्हाळ्यातील गरमीने प्रत्येकजण त्रस्त असतो. उन्हाळ्यात अनेक शारीरिक आजार डोकेवर काढतात. बाहेर पडलात की ऊन तर लागतंच पण त्यासोबतच डिहायड्रेशन, पोटदुखी, मळमळ होणं, चक्कर येणं, त्वचेचे विकार हे आजार होतात. आता उन्हाळ्यामध्ये अनेकांना केसांची समस्या ही उद्भवू शकते. यामध्ये तेलकट टाळू, घाम आणि धूळ यामुळे कोंडा, खाज सुटणे आणि केस गळती याचा समावेश असतो. याची नेमकी कारणे काय? आणि कशा प्रकारची खबरदारी घ्यायला हवी, जाणून घ्या. आजच्या जीवनशैलीत केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. ज्यामुळे पुरूषांपासून महिलांपर्यंत स्त्रिया अस्वस्थ होतात. पण जेव्हा केसांची झपाट्याने गळती होऊ लागते तेव्हा चिंता वाढू लागते. विशेषतः केसगळती ही बऱ्याचदा अनुवंशिक, अनियमित खाणे, जास्त तणाव आणि मद्यपानाचे अतिरिक्त सेवन यामुळे होते. यासाठी केसांची योग्य काळजी राखणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये केसांची...