Health : दात दुखत असतील तर करा ‘हे’ 3 सहजसोपे घरगुती उपाय अन् मिळवा सुटका, जाणून घ्या.

| Updated on: May 29, 2023 | 11:06 PM

जेव्हा दातदुखी सुरू होते तेव्हा डोके देखील गरगरायला लागते त्यामुळे आणखी त्रास होतो. अशावेळी आपण डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेतो. पण काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे दातदुखी कमी होऊ शकते.

Health : दात दुखत असतील तर करा हे 3 सहजसोपे घरगुती उपाय अन् मिळवा सुटका, जाणून घ्या.
Follow us on

Health : आजकाल दात दुखीची समस्या ही बर्‍याच लोकांना होताना दिसते. यामध्ये मग लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला दातदुखीचा त्रास सतवत असतो. यामध्ये मग चॉकलेट खाल्ल्याने, थंड पदार्थ खाल्ल्याने अशा अनेक गोष्टींमुळे दात दुखीची समस्या निर्माण होते. तसंच जेव्हा दातदुखी सुरू होते तेव्हा डोके देखील गरगरायला लागते त्यामुळे आणखी त्रास होतो. अशावेळी आपण डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेतो. पण आज आपण काही अशा घरगुती उपचारांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचा हा त्रास नक्की दूर होईल.

1. लवंग

लवंग हा एक मसाल्याचा प्रकार आहे. हा जरी मसाल्याचा प्रकार असला तरी यात काही असे घटक आहेत जे तुमची दातदुखी कमी करते. ज्यावेळी तुम्हाला दातदुखीचा त्रास जाणवत असेल त्यावेळी जिथे दुखत आहे त्या दातांच्या मध्ये लवंग ठेवून ती थोडी थोडी चावावी जेणेकरून त्याचा रस दातांमध्ये जाईल. लवंग दातांमध्ये धरल्याने तुमची दातदुखी नक्कीच कमी होईल.

2. पेरूची पाने

तुम्ही पेरू आवडीनं खात असाल. पण तुम्हाला माहितीये का की या गोड पेरूसोबत त्याच्या झाडाची पाने खूप फायदेशीर आहेत. पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ती हळू हळू चावून खा यामुळे तुमच्या दातदुखीचा त्रास कमी होईल.

3. गरम पाणी

गरम पाणी देखील दात दुखीवर जालिम उपाय आहे. एका भांड्यात गरम पाणी करा आणि त्यात अर्धा चमचा मीठ टाका. त्यानंतर या पाण्याचे घोट घ्या आणि ते तोंडात तसेच ठेवा ते पाणी गिळू नका जेणेकरून तुमच्या तोंडातील जंतू निघून जातील. ही प्रक्रिया जर तुम्ही 10 ते 15 मिनिटे केली तर तुमचा दातदुखीचा त्रास नक्कीच दुर होईल.