Laptop वर काम करून-करून दुखतात डोळे? जाणून घ्या डोळ्यांचा थकवा कसा दूर करावा
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान खूप विकसित झालं आणि आता लहान मुले, वृद्ध आणि सर्व वयोगटातील तरुण आपला बहुतेक वेळ लॅपटॉपवर घालवतात. कॉम्प्युटर, मोबाइल आणि स्मार्ट टीव्हीसमोर वेळ घालवतात. या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या स्क्रीनमधून जो प्रकाश डोळ्यांवर पडतो त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.

मुंबई: काही दशकांपूर्वी डोळे दुखणे किंवा थकवा येणे ही समस्या खूप कमी होती, कारण तेव्हा फक्त टीव्ही स्क्रीनमुळे डोळ्यांचं नुकसान होत असे. परंतु बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान खूप विकसित झालं आणि आता लहान मुले, वृद्ध आणि सर्व वयोगटातील तरुण आपला बहुतेक वेळ लॅपटॉपवर घालवतात. कॉम्प्युटर, मोबाइल आणि स्मार्ट टीव्हीसमोर वेळ घालवतात. या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या स्क्रीनमधून जो प्रकाश डोळ्यांवर पडतो त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.
स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं धोकादायक
सतत स्क्रीनसमोर वेळ घालवल्यामुळे डोळ्यात थकवा येतो, तसेच डोळ्यात जळजळ होणे, दृष्टी कमकुवत होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवतात, अशा परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी काही सोपे उपाय करता येतील, ज्यामुळे लवकरच आराम मिळेल.
डोळ्यांचा थकवा दूर कसा करावा
सतत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करून तुमचे डोळे थकले असतील तर स्वच्छ पाण्याचे भांडे गरम करून त्यात कापसाचे बोळे घालावे. आता कापसाचे हे बोळे डोळ्यावर ठेवा. आपण ते पापण्यांवर देखील लावू शकता, यामुळे वेदना दूर होतील. कापसामध्ये असलेले पाणी जास्त गरम नसावे अन्यथा नुकसान होईल, याची काळजी घ्या.
एरवी आपण रात्रीच्या अंधारात मोबाईल किंवा लॅपटॉप चालवतो आणि त्यांचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर ताण आणतो आणि डोळे दुखू लागतात. डार्क मोडमध्ये गॅझेट्स वापरण्याचा प्रयत्न करा तसेच अधूनमधून डोळे झाकत राहा. लॅपटॉपवर काम करताना ब्रेक घेणं गरजेचं आहे. डोळे कोरडे पडले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांच्या डोसचा वापर करावा.
जेव्हा डोळ्यांमध्ये थकवा येतो तेव्हा लोक सहसा डोळ्यांवर थंड पाणी शिंपडतात किंवा चेहरा धुतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फ वापरू शकता. यासाठी कापसाला बर्फावर चोळा, नंतर डोळे आणि पापण्यांवर लावा. यामुळे खूप आराम मिळेल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
