AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes चे रुग्ण असाल तर असा खा आंबा, Blood Sugar वाढणार नाही

Diabetes and Mango : आंबा हा अनेकांचा वीक पॉईंट आहे. आंब्याच्या घमघमाटानेच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण जर तुम्ही मुधमेही असाल तर आंबा खाता येईल का? खायचा असेल तर काय पथ्य पाळणार? जाणून घ्या.

Diabetes चे रुग्ण असाल तर असा खा आंबा, Blood Sugar वाढणार नाही
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 18, 2025 | 3:18 PM
Share

Mango in Diabetes : फळांचा राजा आंब्याची चव चाखायला कोणाला आवडत नाही. काही जण तर आंबा खाण्यासाठी खास उन्हाळ्याची वाट पाहतात. उन्हाळा कधी एकदा येतो आणि आंबा खायला मिळतो असे त्यांना होते. आंब्याच्या नावानेच नाही तर घमघमाटाने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. डायबेटीजच्या रुग्णांना सुद्धा आंबा खायला आवडतो. पण रक्तातील शर्करा वाढण्याच्या भीतीने अनेकांना मनाला मुरड घालावी लागते. तर काही जण आंब्यावर ताव मारतातच. पण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे आंबा खायचा असेल तर काही पथ्य पाळणे आवश्यक आहे.

आंब्यामध्ये तंतूमय घटकाचे, फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे साखरेचे शोषण कमी होते. आंब्यात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर अते. मधुमेहींना त्यांच्या आहाराची आणि ते किती उष्मांक, कॅलरीज घेतात, याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे डायबेटिजच्या रुग्णांना आंबा खायचा असेल तर त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना जिभेवर ताबा ठेवावा लागतो. याचा अर्थ जर तुम्ही आंब्याचे एखाद दोन तुकडे घेतले तर त्यानंतर दुसरा पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही. ती नियंत्रित राहील.

आंब्याचा ग्लायसेमिक लोड सर्वाधिक

तज्ज्ञांच्या मते, आंब्याचा ग्लायसेमिक लोड अधिक असतो. ज्या मधुमेहींच्या अहवालात HbA1c हे 6.5 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान असतं, अशा मधुमेह रुग्णांना आंबा खाण्यास मनाई करण्यात येते. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) तुलनेत जास्त असतो. आंब्याचा GI हा 51 ते 60 च्या दरम्यान असतो. त्यामुळे आंबा खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते.

इतर अन्नपदार्थांसोबत खा आंबा

तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर त्याच्यासोबत आहारात प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट्सचे सेवन करा. तशा अन्नपदार्थांचे सेवन करा. हे घटक शरीरात साखरेचे शोषण कमी वेगाने होऊ देतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. आंबा खाण्याआधी थोडं प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त अन्न खा. मधुमेहींनी काही प्रमाणात आंबा खाण्यात काही हरकत नाही. पण त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक घ्या.

डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. तुम्ही अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या. टीव्ही ९ मराठी दुजोरा देत नाही.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....