आई गं… गुडघे ठसठस करताहेत? ठणकाही लागतोय; त्रस्त असाल तर ही योगासने कराच

वाढत्या वयासोबत गुडघेदुखीचा त्रास वाढतो. पण काही योगासनांच्या नियमित अभ्यास केल्याने गुडघेदुखी कमी होऊ शकते.

आई गं... गुडघे ठसठस करताहेत? ठणकाही लागतोय; त्रस्त असाल तर ही योगासने कराच
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 2:09 PM

नवी दिल्ली : जसजसं आपलं वयं वाढतं तसतसा सांधे (joint pain) आणि गुडघेदुखी (knee pain) सुरू होते. पण गुडघे आणि सांधेदुखीची समस्या हिवाळ्यात वाढते. याचे एक कारण म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय (less physical acitivity) नसणे. याशिवाय जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही गुडघेदुखीची तक्रार वाढते. या वेदना (pain in knee) कमी करायच्या असतील तर करण्यासाठी, गुडघ्याचे स्नायू मजबूत केले पाहिजेत. यासाठी योगासने करणे खूप प्रभावी ठरते. योगासने केल्याने पायातील रक्ताभिसरण सुधारते आणि गुडघेदुखी दूर होते.

गुडघे मजबूत करण्यासाठी आणि पायांमधील असंतुलन कमी करण्यासाठी दररोज योगासने करावीत. गुडघे आणि सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी काही योगासनांच्या नियमित सरावाने पाय, घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होतील. ती आसने कोणती ते जाणून घेऊया.

त्रिकोणासन

हे सुद्धा वाचा

या योगासनाच्या सरावाने स्नायूंचे दुखणे कमी होते. त्रिकोनासन करण्यासाठी सरळ उभे रहा. आता पायांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवा आणि दीर्घ श्वास घेताना शरीर उजवीकडे झुकवा. नंतर डावा हात वरच्या दिशेने न्या. डोळ्यांवर डाव्या हाताची बोटं स्थिर ठेवा. काही वेळ या आसनात राहा आणि नंतर सामान्य स्थितीत या. आता दुसऱ्या बाजूने हीच क्रिया पुन्हा करा. यामुळे स्नायूदुखी कमी होऊन गुडघेदुखीपासून आराम मिळण्यासा मदत होते.

मलासन

मलासनाचा सराव करण्यासाठी सरळ उभे राहून दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता हात प्रार्थनेच्या मुद्रेत आणा आणि हळू हळू खाली बसा. श्वास सोडताना, पुढे वाका. हाताची दोन्ही कोपरं मांड्यांच्या दरम्यान 90 अंशाच्या कोनात घ्या आणि सामान्यपणे श्वास घ्या. नंतर सामान्य स्थितीत सरळ उभे रहा.

पार्श्वोत्तनासन

या योगासनास पिरॅमिड पोज असे म्हणतात. पार्श्वोत्तनासन करण्यासाठी, उजवा पाय पुढे करा आणि 45-अंशाचा कोन तयार करा. आता पुढे वाकून हातांना जमिनीवर स्पर्श करा. मात्र असे करताना गुडघे अजिबात वाकणार नाहीत याची काळजी घ्या. काही काळ या अवस्थेत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या. हे आसन नियमितपणे केल्यास गुडघेदुखीचा त्रास हळूहळू कमी होईल.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.