Eye Care Tips: डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘हे’ उपाय

| Updated on: Dec 13, 2022 | 10:40 AM

डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी अक्रोड, मासे आणि लिंबूवर्गीय फळांचे सेवन जरूर करावे. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

Eye Care Tips: डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी फॉलो करा हे उपाय
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – डोळे हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील अवयव आहे. सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये अनेक जण कामाच्या व्यापामुळे डोळ्यांची नीट काळजी (eye care) घेऊ शकत नाही. कामानिमित्ताने तासन्तास लॅपटॉपवर काम करणे आणि मोबाईलचा सतत वापर (overuse of mobile, laptop) केल्यामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळे सुजणे आणि डोकेदुखी अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. तसेच चष्मा न लावता बराच वेळ लॅपटॉपवर काम केल्याने दृष्टी अंधुक (effect on eyesight) होऊ लागते. लॅपटॉप व मोबाईलमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाइटमुळे असे होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये डोळ्यांचे आरोग्य अधिक बिघडू नये, यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते.

जर तुम्हीही कामानिमित्त बराच काळ लॅपटॉप अथवा मोबाईलवर घालवत असाल तर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

– लॅपटॉपवर सतत काम करत असाल तर 20 ते 30 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवा. त्यासाठी कामातून थोडा ब्रेक घ्या किंवा स्क्रीन सोडून इतर ठिकाणी बघा व लक्ष केंद्रित करा. त्यानंतर तुम्ही तुमचे काम पुन्हा सुरू करू शकता.

हे सुद्धा वाचा

– बर्फाचा वापर करा. यासाठी बर्फाचे छोटे तुकडे किंवा क्युब्स एका सुती कापडामध्ये बांधून आपल्या डोळ्यांवर ठेवावेत. तसेच दर दोन तासांनी साध्या पाण्याने डोळेो स्वच्छ धुवावेत. यामुळेही डोळ्यांना आराम मिळेल.

– डोळ्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी अक्रोड, मासे आणि लिंबूवर्गीय फळांचे सेवन जरूर करावे. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. त्याशिवाय व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचेही सेवन करावे, यामुळे आपली दृष्टी सुधारते. तसेच डोळ्यांसंदर्भात उद्भवणाऱ्या समस्याही दूर होतात.

– फोकस चेंज व्यायाम करावा. यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हा व्यायाम करण्यासाठी आधी डोळे बंद करावेत, त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांनी डोळे झाकावेत. हाताच्या बोटांवर लक्ष केंद्रित करावे. नंतर हळूहळू दोन्ही हात डोळ्यांपासून दूर करावेत व परत जवळ आणावेत. यावेळी हातांच्या बोटांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. हा व्यायाम रोज करावा. त्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)