Corona : केरळमध्ये मास्क लावणे अनिवार्य, राज्यात Covid 19 च्या सर्वाधिक केसेसची नोंद

| Updated on: Jan 17, 2023 | 9:46 AM

केरळमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक सक्रिय केसेस असून कोरोनाला आळा घालण्यासाठी केरळ सरकारने मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागी आणि सभा-मेळाव्यांमध्ये लोकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Corona : केरळमध्ये मास्क लावणे अनिवार्य, राज्यात Covid 19 च्या सर्वाधिक केसेसची नोंद
Image Credit source: Freepik
Follow us on

तिरुअनंतपुरम – देशभरात जरी कोरोना विषाणूची (Corona) लागण झालेल्या लोकांची संख्या कमी होत असली तरी अनेक राज्य सरकारे कोरोना विषाणूसंदर्भात खूप खबरदारी घेत आहेत. सोमवारी केरळ सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क (mask is mandatory) घालणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय दुकाने, चित्रपटगृहे आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजकांना सॅनिटायझर पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) नियमही पाळले जावेत, असे केरळ सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

केरळमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक सक्रिय केसेस

यापूर्वी राज्य सरकारने 12 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात, राज्यात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे, देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यनंतर कर्नाटक, महाराष्ट आणि ओदिशाचा क्रमांक लागतो. 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,149 इतकी होती.

हे सुद्धा वाचा

कोणत्या राज्यात कोरोनाच्या किती केसेस?

भारतात केरळमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,303 आहे, तर कर्नाटकमध्ये हा आकडा 146 इतका आहे. तसेच महाराष्ट्रात 139, ओदिशामध्ये 87, पॉंडिचेरीमध्ये 76, पश्चिम बंगालमध्ये 55, तेलंगणामध्ये 41, उत्तराखंड व उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी 18, तर राजस्थानमध्ये हा आकडा 6 इतका आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात 114 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली आहे. यासह, 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 केसेसमध्ये 30 अंकांची घट नोंदवण्यात आली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या 1,08,55,369 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 33,698 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये गेल्या सात दिवसांत 2, 23,107 लोकांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.