AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्थमाचा त्रास होतोय…? मग आजच पुण्याच्या बीएसआयमध्ये जाऊन अस्थमावरील रामबाण औषध घ्या!

पुण्यामध्ये अस्थमावरील (Asthma) एका खास वनस्पतीचा शोध लागला आहे. या वनस्पतीचे नाव अंतमूळ असे आहे. विशेष म्हणजे असे सांगितले जात आहे की, ही अस्थमावर उपचार करण्यासाठी रामबाण वनस्पती आहे. पुण्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने अंतमूळ नावाची औषधी वनस्पती (Herbs) रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

अस्थमाचा त्रास होतोय...? मग आजच पुण्याच्या बीएसआयमध्ये जाऊन अस्थमावरील रामबाण औषध घ्या!
Image Credit source: Researchgate.net
| Updated on: Apr 18, 2022 | 9:39 AM
Share

पुणे : पुण्यामध्ये अस्थमावरील (Asthma) एका खास वनस्पतीचा शोध लागला आहे. या वनस्पतीचे नाव अंतमूळ असे आहे. विशेष म्हणजे असे सांगितले जात आहे की, ही अस्थमावर उपचार करण्यासाठी रामबाण वनस्पती आहे. पुण्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने अंतमूळ नावाची औषधी वनस्पती (Herbs) रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पुण्यामध्ये (Pune) बीएसआयचे मोठे कार्यालय असून ते जवळपास 60 वर्ष जुने आहे. या कार्यालयाच्या परिसरामध्ये अनेक औषधी वनस्पती आपल्याला बघायला मिळतील.

बीएसआयने लावला नवीन वनस्पतीचा शोध

या अंतमूळ नावाच्या वनस्पतीची पाने अत्यंत खास आहेत. या वनस्पतीमध्ये टायलोफ्लोरिन नावाचे अल्कलॉईड आहे. विशेष म्हणजे याचा वापर अनेक ट्रायल्समध्ये केला जाऊ शकतो, हे समजले आहे. या दरम्यानच आता अस्थमा आजारावर ही वनस्पती प्रभावी असल्याचे समोर आले आहे. आता अनेक औषधी कंपन्यांनी या वनस्पतीच्या पानांचा काढा केला आणि त्यामध्ये 1 टक्का अल्कलॉईड देखील आहे. या वनस्पतीचे अंतमूळ हे आयुर्वेदातील नाव आहे. बॉटनीमध्ये या वनस्पतीला टायलोफ्लोरा अस्थमॅटिका असे म्हटंले जाते. विशेष म्हणजे ही वनस्पती फक्त अस्थमासाठी गुणकारी नसून त्वचेसाठी देखील रामबाण आहे.

रूग्णांना पुण्यात मिळणार ही वनस्पती

अस्थमावरील रामबाण उपाय असलेली ही वनस्पती आता बीएसआयच्या वनस्पती उद्यानमध्ये दिसणार आहे. या उद्यानामध्ये अनेक जातीच्या औषधी वनस्पती लावून त्याचे संरक्षण केले जाते. या उद्यानमध्ये नेमक्या किती औषधी वनस्पती आहेत, हे सांगणे थोडे अवघड आहे. कारण याची माहिती फक्त आणि फक्त येथील शास्त्रज्ञांनाच असते. जर आपल्यालाही अस्थमाचा त्रास होत असेल तर आपणही बीएसआयमध्ये जाऊन या अस्थमावरील हे औषध घेऊ शकता. मात्र, ही वनस्पती कोणालाही दिली जात नाही. यासाठी आपल्याला डाॅक्टरांचे तसे पत्र लागते. रूग्णांला आपल्या स्वत: च्या जबाबदारीवर याचे सेवन करावे लागते.

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : उन्हाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा आणि निरोगी राहा!

Skin Care | सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, मात्र खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!

Follow Us
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?