‘वर्क फ्रॉम होम’मुळे शरीराला जडपणा आलाय… हे पदार्थ उपयुक्त ठरतील

| Updated on: Jan 31, 2022 | 10:33 AM

अनेक कंपन्यांचे कर्मचारी अजूनही घरातूनच कामे करीत आहेत. त्यामुळे याचा परिणाम साहजिक त्यांच्या शरीरावर जाणवत आहे. लठ्ठपणा मग त्यातून येणारा मधूमेह, उच्च रक्तदाब आदी समस्यांमुळे सर्वेच हवालदिल झाले आहे. घरी बसून आलेल्या जडपणाला खालील काही गोष्टी फायदेशीर ठरु शकतात.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे शरीराला जडपणा आलाय... हे पदार्थ उपयुक्त ठरतील
heavy-stomach-issue-in-WFH
Follow us on

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (work from home) करायला लावले होते. जशी जशी कोरोनाची (corona) लाट ओसरली तसे कर्मचाऱ्यांना पुन्हा आपल्या कार्यालयात बोलवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे साहजिक याचा दुष्परिणाम संबंधितांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. अनेक महिन्यांपासून घरुनच काम करण्याची सवय असल्याने अनेकांच्या शरीराला जडपणा (heavy stomach) जाणवत आहे. शारीरिक हालचाली होत नसल्याने तसेच अनेकांचे बसूनच काम असल्याने लठ्ठपणा मग त्यासोबत मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार जडताना दिसत आहेत. अशा कामाच्या स्वरुपामुळे लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. आज आपण असे काही पदार्थ आहेत, ज्यांचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी ठेवता येते, त्याबाबत चर्चा करणार आहोत.

सफरचंद

सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. शिवाय यात मोठ्या प्रमाणात असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होत असते. आरोग्यासाठी हे फायदेशीर असते. पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यात फायबरची महत्त्वाची भूमिका असते आणि म्हणूनच डॉक्टर दिवसातून एकदा सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद नियमितपणे खाल्ल्यास चेहऱ्यावर चमकही राहते. रोज एक सफरचंद खाल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

दह्याचा समावेश करावा

आपल्या रोजच्या जेवणामध्ये दही आवर्जून घ्यावे. दही हे आपल्या पचनसंस्थेला चांगले ठेवण्यासाठी मदत करीत असते. म्हणून जेवणासोबत दह्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. दह्यात असलेले बॅक्टेरिया पचनक्रिया मजबूत करतात. चविष्ट असल्याने मुलांनाही ते खायला आवडते. हिवाळ्यात दही दुपारी खाणे चांगले मानले जाते.

बीट ठरेल वरदान

बीट हे सहजतेने उपलब्ध होते. ते अत्यंत गुणकारी असून एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. त्यात आढळणारे लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम शरीरातील अन्न पचवण्यास मदत करतात. यासोबतच बीट इतर अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवते. जर तुम्हाला याचा आहारात समावेश करायचा असेल तर तुम्ही ते सॅलडच्या स्वरूपात किंवा त्याचा रस काढल्यानंतरही पिऊ शकतात. यातून अनेक चमत्कारीक फायदे शरीराला होत असतात.

ओट्स

शरीराला जडपणा आला असेल तर दिवसातून एकदा आहारात ओट्सचा समावेश नक्की करा. ओट्‌स पचायला अतिशय हलके आहे आणि त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. निरोगी पचनसंस्थेसाठी फायबर चांगले असते आणि ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. जर तुम्हाला ओट्स आणखी हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही ते बनवताना त्यात गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करू शकता. ते खायलाही अतिशय रुचकर लागते.

संबंधित बातम्या

Bathing Tips : अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक

दरवर्षी डासांमुळे लाखांवर मृत्यू, तरीही शास्त्रज्ञ डासांना वाचवतात! जर डासच नसतील तर काय होईल?

Black Pepper Essential Oil : आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळी मिरीचे तेल, जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे