
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात (Summer) आरोग्याबरोबरच त्वचेची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. उन्हाळ्यात अनेक वेळा थकवा आणि निर्जलीकरण जाणवते. या ऋतूत स्वत:ला हायड्रेट (Hydrate) ठेवणे खूप गरजेचे आहे. या काळात जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनमुळे शरीरात पाण्याची कमतरता तर होतेच पण पीएच पातळीही कमी होते. पीएच पातळी राखण्यासाठी आपल्याला पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, क्लोराईड आणि फॉस्फरस (Phosphorus) सारख्या पोषक तत्वांची देखील आवश्यकता आहे. या घटकांना इलेक्ट्रोलाइट्स देखील म्हणतात. तुमच्या शरीरात इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले असणे महत्त्वाचे आहे.
गुलाब दूध
एका भांड्यात 1 कप पाणी, 1 कप दूध, 4-5 लाल गुलाबाच्या पाकळ्या, 1 चमचे सब्जा आणि 2 हिरवी वेलची मिक्स करा. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी व्यायाम आणि कसरत केल्यानंतर याचे सेवन करा.
कच्ची केळी
कच्च्या केळीमुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढते. कच्च्या केळ्याची साल काढा आणि त्याचे पातळ काप करा. खोबरेल किंवा तिळाच्या तेलात तळून घ्या. त्यात चाट मसाला किंवा हिरवी मिरची घालून सेवन करा.
सूप
सध्या हंगामामध्ये आपल्या आहारामध्ये सूपचा देखील समावेश करा. मात्र, शक्यतो घरीच सूप तयार करा बाहेरील आणणे टाळाच. टाॅमेटा, कलिंगड, पालक, कोबी सूपचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो.
गाजर ज्सूस
गाजर-संत्र्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो. या सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा रस दररोज प्यायला हवा. मात्र, ताजा असतानाच प्या. तसेच शक्यतो ज्यूस दुपारच्या वेळीच घ्या.
आंबट फळे
संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे हे व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि फोलेटमध्ये समृद्ध असतात. त्यात बरीच महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. उन्हाळ्यात ही फळं खाऊन तुम्ही स्वत: ला हायड्रेटेड ठेवू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात या फळांचा आहारात समावेश करा.
संबंधित बातम्या :
Parenting Tips : तुमचं मुल दिवसेंदिवस हट्टी बनत चाललंय?, ‘या’ गोष्टी करा, नक्की बदल जाणवेल…