
आपल्या देशात अनेक आजारात शरीरात गुपचुप शिरकाव करीत हळूहळू तेथे बस्तान मांडत आपले आरोग्य संकटात आणत आहेत. डायबिटीज देखील त्यापैकी एक आहे. अनेक लोक यास गांभीर्याने घेत नाहीत. नंतर मोठी समस्या बनल्यानंतर त्याकडे त्यांचे लक्ष जाते. अलिकडेच लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका अभ्यासात आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. भारतातील १० पैकी ४ जणांना त्यांना डायबिटीज असल्याचे माहिती नसल्याचे उघडकीस आले आहे.
हा अभ्यास २०१७ ते २०१९ दरम्यान ४५ हून अधिक वयोगटाच्या व्यक्तींवर करण्यात आला.यात आढळले की या वयोगटातील २० टक्के लोक डायबिटीजने पीडीत आहे. पुरुष आणि महिला, दोघांमध्ये याचे प्रमाण जवळपास सारखे आहे. अभ्यासात हे देखील पुढे आले आहे की शहरी भागात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. याचे कारण जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींची कमतरता मानले जात आहे.
भारतात २० ते ७९ वयोगटातील व्यक्तींमध्ये डायबिटीजच्या रुग्णांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.२०१९ मध्ये भारतात झालेल्या एकूण मृत्यूमध्ये सुमारे ३ टक्के मृत्यू डायबिटीजने झाले आहेत. याच बरोबर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. दोन्ही आजार जर वेळीच ओळखून नियंत्रित केले नाही तर ते हृदय, किडनी आणि डोळ्यांच्या गंभीर समस्येचे कारण बनू शकतात.
अभ्यासात असे उघड झाले आहे की भारताच्या ग्रामीण क्षेत्रात डायबिटीज आणि हायब्लडप्रेशरच्या उपचाराची सुविधा खूपच कमजोर आहे. ICMR आणि WHO द्वारा सात राज्यांच्या १९ जिन्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात कळाले की केवळ ४० टक्के सब-सेंटर्स या आजारांवर उपचारासाठी तयार आहेत.
एक तृतीयांश केंद्रात डायबिटीजचे औषध मेटफॉर्मिन उपलब्ध नव्हते.
जवळपास अर्ध्या केंद्रांवर ( ४५ टक्के ) उच्च रक्तदाबावरील एम्लोडिपिन औषधांचा कमतरता
डायबिटीज आणि हायब्लड प्रेशर दोन्ही असे आजार आहेत. ज्यात वेळेत निदान आणि योग्य औषध घेतले तरच तो नियंत्रणात येतो. सुरुवातीचे निदान, संतलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधे घेतली तरच या आजारात होणाऱ्या गंभीर नुकसानाला रोखता येते.