International Beer Day 2022: बीअर पिण्याचे फायदे आणि तोटे माहीत आहेत का ? बसेल आश्चर्याचा धक्का

मद्यपान करणे शरीरासाठी हानिकारक असते असे आपण नेहमी ऐकतो. मात्र बीअर पिण्याचे शरीराला काही फायदे तर काही तोटे होतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'इंटरनॅशनल बीअर डे' साजरा केला जातो.

International Beer Day 2022: बीअर पिण्याचे फायदे आणि तोटे माहीत आहेत का ? बसेल आश्चर्याचा धक्का
बियरच्या बॉटलने केला हत्याकांडाचा उलगडाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 5:30 PM

Beer Health Effects: जगभरातील लोक हजारो वर्षांपासून बीअर पीत आहेत. बीअर हे एक लोकप्रिय अल्कोहोलिक पेय आहे. साधारणत: बीअरमध्ये 4-6 टक्के अल्कोहोल (Alcohol) असते मात्र काही बी्रमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असू शकते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘इंटरनॅशनल बीअर डे’ (International Beer Day) साजरा केला जातो. बीअर पिण्यामुळे शरीराला काही फायदे मिळतात तर त्याचे काही तोटेही (Benefits and downsides of drinking beer) असतात. बीअर आंबवलेल्या धान्यापासून बनवली जाते. लाईट ड्रिंकच्या शोधात असलेले लोक बऱ्याचदा बियरला प्राधान्य देतात. मद्यपान करणे शरीरासाठी हानिकारक असते असे आपण नेहमी ऐकतो. त्यामुळे आरोग्याला धोका पोहोचतो असे म्हणतात. पण काही संशोधनांनुसार, बीअर पिण्याचे काही फायदेही असतात. जाणून घेऊया बीअर पिण्याचे फायदे व तोटे काय आहेत.

बीअरमुळे होणारे फायदे

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, बीअरच्या 335 मिलिग्रॅमच्या कॅनमध्ये 153 कॅलरी असतात.त्यामध्ये काही मिनरल्स व व्हिटॅमिन्सही असतात. बिअर ही धान्य (Cereals) आणि यीस्टपासून (Yeast) बनलेली असते. काही संशोधनांनुसार, बीअर प्यायल्याने हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. बीअरमधील अल्कोहोल काही प्रमाणात रक्तातील साखरचे पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करतो. मधुमेहाशी लढा देणाऱ्या लोकांनी बीअरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टंस कमी होतो आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. कमी प्रमाणआत बीअर प्यायल्याने पुरूष व स्त्रिया यांची हाडे मजबूत होतात. तसेच डिमेन्शियाचा धोकाही कमी होतो. बीअर प्यायल्यामुळे आतड्यांना फायदा होतो. बीअरचे सेवन आतड्यातील मायक्रोबायोटाच्या संरचनेच्या सुधारणेत योगदान देते. बीअरमध्ये जुनाट आजारांना रोखण्याची क्षमता असते. सोप्या भाषेत सांगायचं झाल तर बीअर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवते.

मात्र बीअर जास्त प्रमाणात पिण्याचे काही तोटेही आहेत. ते जाणून घेऊया.

  • बीअरमध्ये अल्कोहोल असते. जास्त प्रमाणात बीअर प्यायल्यास वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोका असतो.
  • सतत बीअर प्यायल्यास त्याचे व्यसन लागू शकते. जे शरीरासाठी धोकादायक ठरते.
  • बीअर न पिणाऱ्यांच्या तुलनेत बीअर पिणाऱ्या लोकांना डिप्रेशनचा धोका अधिक असतो.
  • बीअरचे अति प्रमाणात सेवन केल्यास लिव्हर सोरायसिस सारखे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. हा आजार कधीकधी जीवावरही बेतू शकतो.
  • बीअरच्या एका कॅनमध्ये साधारणपणे 153 कॅलरीज असतात. दररोज बीअर प्यायल्यास वजन वाढू शकते.
  • अल्कोहोलयुक्त पेय प्यायल्यामुळे गळा व तोंडाचया कर्करोगाचा धोका वाढतो.
  • बीअरचे अति प्रमाणात सेवन केल्यास डिमेंशिया होण्याचा धोकाही वाढतो.
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.