जिभेचा भाग पडला पांढरा पडलाय का? या विटामिन्सची असू शकते कमतरता

| Updated on: Mar 01, 2023 | 8:28 AM

आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असलेली जिभ अनेक दृष्टीने महत्वाची असून तिचे आरोग्य जपणे आपल्या हातात आहे.

जिभेचा भाग पडला पांढरा पडलाय का? या विटामिन्सची असू शकते कमतरता
White-Tongue
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : आपली जिभ आपल्या आरोग्य कसे आहे याचे संकेत देत असते. त्यामुळेच डॉक्टर आपल्या जिभेची तपासणी करीत असतात. जर आपल्या शरीरात कसली कमतरता असेल तर त्याची तपासणी जिभेवरून होत असते. विटामिन बी – १२ जर आपल्या शरीरात कमी असेल तर जिभेच्या रंगावर होऊ शकतो परीणाम. जीभेचा उपयोग अन्न गिळण्यापासून ते मेंदूत चाललेले विचार व्यक्त करण्याचे कामही जीभ करते. जिभेचा पोत वा रंगात होणारा कोणताही बदल म्हणजे आजार होण्याचा संकेत असतो. तर मग पाहूया जिभेचे आरोग्य कसे असते…

विटामिन्स बी – १२ शरीरासाठी अनेक प्रकारे काम करीत असते. हे आपल्या मेंदूला आणि मज्जासंस्थेला हेल्दी ठेवण्यासाठी सहाय्य करीत असते. तसेच महिलांच्या गरोदर पणातही ते परीणाम करीत असते. तसेच महिलांमध्ये असलेल्या अॅनिमियाच्या लक्षणांनाही ते कमी करते. परंतू आपण आज याच्या कमतरतेमुळे जिभेवर होणारे परिणाम पाहणार आहोत.

१. लालरंगाचा जाड थर आणि खडबडीत जिभ –

लाल रंगाचा जाड थर आणि खरबडीत जिभ बी – १२ च्या कमतरचे एक लक्षण आहे. यास ग्लोसिटिस म्हणतात. यात जिभ जाडसर आणि विचित्र दिसते. काही वेळा सूज आल्यासारखे पण दिसते.

२. जिभेचा बहुतांशी भाग पांढरा दिसणे…

जिभेचा मोठा भाग पांढरा दिसणे हे देखील विटामिन्स बी -१२ च्या कमतरतेचे लक्षण मानले जाते. यास जिओग्राफीक टंग म्हटले जाते. यात जिभेवर पांढरा थर जमतो. यात जिभेचा रंग फिका सुद्धा पडू शकतो. तसेच जिभेवर दुखणारे पॅचेस देखील पडू शकतात.

३. जिभेचा अल्सर होणे –

तोंडाचा अल्सर होणे हे देखील विटामिन्स बी – १२ च्या कमतरतेचे महत्वाचे लक्षण असू शकते. यात काही वेळा जिभेवर आणि तोंडात बारीक बारीक फोड येऊ शकतात. या आजारात विटामिन्स बी – १२ ने परीपूर्ण आहार घेणे गरजेचे असते. या आहारात मटण, मासे, दूध, पनीर, अंडे आणि काही ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करायला हवा. ही आहाराची बाब झाली परंतू आपल्याला याची लक्षणे जाणवली तर आपल्या डॉक्टरांची नक्की भेट घ्या

४. जिभेचा रंग फिका पडणे –

जिभेचा रंग फिका पडणे  म्हणजे तुम्ही अ‍ॅनिमिक आहात. शरीरात लोहाची कमतरता आणि तोंडाच्या उतींना पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यास जिभेचा गुलाबी रंग फिका पडतो. पेशी व उतीपर्यंत रक्ताच्या माध्यमातूनच ऑक्सिजन पोहोचतो. अशा स्थितीत भरपूर लोह असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.