जिना चढताना तुम्हालाही दम लागतो का ? यापैकी तर कोणता आजार नाही ना, करा चेक

जिना चढता - उतरताना, चालता-फिरताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

जिना चढताना तुम्हालाही दम लागतो का ? यापैकी तर कोणता आजार नाही ना, करा चेक
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 02, 2023 | 5:13 PM

नवी दिल्ली | 2 ऑगस्ट 2023 : श्वासोच्छवास हा (breath) आयुष्याचा महत्वपूर्ण भाग आहे. श्वास सुरू असेपर्यंतच माणूस जिवंत असतो. त्यामुळेच शरीरात एखाद्या गंभीर आजाराची एंट्री झाली तर सर्वात पहिले (आपल्याला) श्वास घेण्यास त्रास (breathlessness) होऊ लागतो. उदा- तुम्हाला जिना चढताना त्रास होत असेल किंवा कोणतीही समस्या जाणवत असेल किंवा चालता-फिरताना श्वास फुलत असेल तर हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, फुफ्फुसात किंवा हृदयामध्ये संसर्ग,पॅनीक ॲटॅक आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीत अडथळा येणे, यांमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. आणि यामुळेच तुम्ही वेगाने पायऱ्या चढता- उतरता किंवा जोरात चालता तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.

छातीत काहीही वेदना होत असतील तर डॉक्टरांची घ्या भेट

श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच, खोकला, घाबरल्यासारखे वाटणे, छातीत वेदना किंवा जखडल्यासाराखे वाटणे, शिंका येणे, बंद नाक आणि घशात वेदना यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. वेळ न घालवता लगेचच डॉक्टरांना दाखवा आणि योग्य उपचार सुरू करा.

बदलत्या ऋतूत घ्या खास काळजी

आजकाल हवामान खूप वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीत श्वसनाचे आजार खूप धोकादायक बनतात. यावेळी व्हायरस आणि बॅक्टेरियाचा धोका वाढतो. अशा वेळी काही खास काळजी घेतली पाहिजे.

धूम्रपान करू नका, जंक फूड खाणे टाळा.

धूम्रपान, मद्यपान करणे तसेच जास्त जंक फूड खाणे, यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच चरबीयुक्त अन्न सोडले पाहिजे. यामुळे हा आजार गंभीर होऊ शकतो.

फुफ्फुस डिटॉक्स करण्यासाठी भाज्या आणि फळ खावीत

फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी तसेच डिटॉक्स करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी पदार्थ खाणे आवश्यक आहे. म्हणूनच हळद, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, भोपळा, सफरचंद, बीटरूट यांचा आहारात समावेश केला पाहिजे.

जर तुम्हाला कोणत्याही समस्येशिवाय किंवा त्रासाशिवाय श्वास घ्यायचा असेल, तर फुफ्फुसे स्वच्छ करा. यासाठीतच रोज आलं, लिंबू आणि मध घातलेला हर्बल चहा रोज प्या. हा चहा फुफ्फुसातील नसांना आराम देण्यासोबतच त्यातील घाणही दूर करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)