ऐतिहासिक! कॅन्सरचा एक ना एक रुग्ण बरा झाला, आतड्याच्या कॅन्सरवर अमेरिकेत मोठं यश, वाचा सविस्तर

| Updated on: Jun 08, 2022 | 10:10 AM

सुरूवातीला आपण वाढणाऱ्या लठ्ठपणाकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतो. बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की, आता थोडे वजन वाढले तरीही काही हरकत नाही. थोड्या दिवसांनी आपण व्यायाम आणि डाएट करून वजन कमी करू शकतो. मात्र, हा विचार अत्यंत चुकीचा आहे. दररोज व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमुख कारण लठ्ठपणा आहे.

ऐतिहासिक! कॅन्सरचा एक ना एक रुग्ण बरा झाला, आतड्याच्या कॅन्सरवर अमेरिकेत मोठं यश, वाचा सविस्तर
Image Credit source: unsplash.com
Follow us on

मुंबई : कोलोरेक्टल हा एक कर्करोगाचा (Colorectal Cancer) खतरनाक प्रकार आहे. सुरूवातीला या कर्करोगाची लक्षणे दिसत नाहीत आणि गंभीर स्वरूप धारण केल्यावर हा समजतो. भारतामध्ये दरवर्षी कोलोरेक्टल या कर्करोगामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. स्तन, गर्भाशय आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल आपण अनेकदा ऐकले असेल. थोडक्यात सांगायचे झाले तर कोलोरेक्टल हा आतड्याचा कर्करोग (Bowel cancer) आहे, जो अतिशय जीवघेणा ठरतो. कोलोरेक्टल हा कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र, यामध्ये प्रमुख म्हणजे आपली खराब जीवनशैली हे आहे. आपण दिवसातून किमान दहा जणांना बोलताना ऐकले असेल की, आॅफिसचे टेन्शन आणि काम यामुळे मला अजिबात व्यायाम (Exercise) करायला वेळ मिळत नाही काय करणार ना…परंतू तुम्हाला हे जाणून नक्कीच धक्का बसेल की, कोलोरेक्टलसारखा भयानक कर्करोग हा लठ्ठपणामुळे होतो.

आतड्याच्या कॅन्सरवर अमेरिकेत मोठे यश

आपल्याला माहिती आहे की, दरवर्षी संपूर्ण जगामध्ये आतड्याच्या कर्करोगामुळे लाखो लोकांचा जीव जातो. मात्र, आता सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेमध्ये झालेल्या नव्या संशोधनानुसार आतड्यांचा कर्करोग बरा होतो आहे. विशेष म्हणजे आतड्याचा कर्करोग झालेली व्यक्ती 100 टक्के चांगली होते आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, 18 रुग्णांनी डॉस्टारलिमॅब नावाचे औषध सुमारे सहा महिने घेतले आणि शेवटी त्यांचा कर्करोग गायब झाला. डॉस्टारलिमॅब हे प्रयोगशाळेत तयार केलेले रेणू असलेले औषध आहे. जे मानवी शरीरात पर्यायी प्रतिपिंडे म्हणून काम करते. 18 लोकांना हे औषध दिले गेले आणि विशेष बाब म्हणजे या 18 लोकांच्या शरीरातून पूर्णपणे कर्करोग नष्ट झाला.

हे सुद्धा वाचा

कोलन पेशींची जास्त प्रमाणात वाढत होते

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपली सर्वांचीच लाईफस्टाइल खूप जास्त खराब झालीये. रात्री उशीरा झोपणे, सकाळी उशीरा उठणे, घरचा चांगला आणि सकस आहाराचे सेवन न करता सतत बाहेरच्या अन्नाचे सेवन करणे. व्यायाम अजिबात न करणे. यामुळे आपले शरीर रोगांचे माहेर घर होऊन बसते. लठ्ठपणामुळे फक्त मधुमेह वगैरेच होत नाहीतर कोलोरेक्टल कर्करोग देखील होतो. कोलोरेक्टल कर्करोग हा कोलन पेशी जास्त प्रमाणात वाढल्यामुळे होतो. बऱ्याच लोकांना लाल मांस इतके खायला आवडते की, सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत लाल मांसच्या अनेक पदार्थांचे ते सेवन करतात. यामुळे देखील कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. बरेच लोक फास्टफूड खाण्याच्या नादामध्ये फायबरचे खूप कमी सेवन करतात हे देखील एक कारण आहे कोलोरेक्टल कर्करोग होण्याचे.

खराब जीवनशैली कारणीभूत ठरते

सुरूवातीला आपण वाढणाऱ्या लठ्ठपणाकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतो. बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की, आता थोडे वजन वाढले तरीही काही हरकत नाही. थोड्या दिवसांनी आपण व्यायाम आणि डाएट करून वजन कमी करू शकतो. मात्र, हा विचार अत्यंत चुकीचा आहे. दररोज व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमुख कारण लठ्ठपणा आहे. 50 लठ्ठ लोकांना कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी आपण योगा, सायकलिंग, पोहणे आणि चालणे हे व्यायाम नक्कीच करायला हवेत. जर तुम्ही दररोज जिमला जात असाल तर अधिकच चांगले आहे. निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे.

जाणून घ्या कोलोरेक्टल कर्करोगाची प्रमुख लक्षण

  1. -आजोबा पंजोबा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अगोदर कोलोरेक्टल कर्करोगाची लागण झाली असेल तर येणाऱ्या पिढीला जास्त कोलोरेक्टल कर्करोगाची शक्यता असते.
  2. -धुम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जे लोक अतिप्रमाणात धुम्रपान करतात, त्यांना देखील कोलोरेक्टल कर्करोगाची लागण लवकर होते.
  3. -जे लोक लाल मांसचे अधिक सेवन करतात. त्यांना देखील कोलोरेक्टल कर्करोगाची लागण होते. यामुळे कोणतेही गोष्ट प्रमाणात खा.
  4. -कोलोरेक्टल कर्करोगाची लागण होण्याचे दुसरे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये फायबरची कमी. आपल्या सर्वांना माहिती आहे. पालेभाज्या, कडधान्य आणि फळांमधून आपल्या शरीराला फायबर मोठ्या प्रमाणात मिळते.
  5. -जर एखाद्या व्यक्तीला सतत पोटदुखीची समस्या होत असेल तर हे कोलोरेक्टल कर्करोगाचे कारण असू शकते. अशावेळी आपण शक्य आहे तितके लवकर डाॅक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
  6. -जर मल नेहमीच काळा रंगाचा येत असेल तर ही एक धोक्याची घंटा आहे. अशावेळी आपण डाॅक्टरांना दाखवून तपासण्या करून घ्यायला हव्यात.
  7. -जास्त काम न करता आणि सतत एकाच जागी बसून आराम केल्यानंतरही तुम्ही आशक्तपणा येत असेल तर हे कोलोरेक्टल कर्करोगाचे कारण असू शकते.