अलर्ट | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती

| Updated on: Mar 15, 2023 | 2:35 PM

राज्यात एकिकडे कोव्हिडच्या रुग्णांमध्ये नव्याने वाढ होत आहे तर H3N2 संसर्ग झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावरून महत्त्वाची माहिती दिली.

अलर्ट | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | राज्यात अहमदनगर (Ahmednagar) आणि नागपूर (Nagpur) या दोन शहरात झालेल्या दोन मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणांची अक्षरशः झोप उडाली आहे. नव्या H3N2 विषाणूमुळे हे मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. हे दोन बाधित ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांना ट्रेस करून त्यांची कोरोना चाचणी करण्याचं आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यातच नव्या H3N2 विषाणूमुळे आणखी काय धोका असू शकतो, असे प्रश्न राज्याच्या जनतेला पडले आहेत. नगर आणि नागपूरमध्ये झालेल्या दोन मृत्यूंमागे H3N2 इन्फ्लुएंझा हेच कारण होतं का, यावरूनही तर्क-वितर्क लावले जात आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यावर सविस्तर उत्तर दिलंय. या दोन्ही रुग्णांना H3N2 ची बाधा होतीच. मात्र त्यासोबतच कोविड 19 आणि इतर आजारदेखील त्यांच्या मृत्यूसाठी कारण ठरल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलंय. यासंदर्भातील सविस्तर अहवाल अजून येणं बाकी आहे. त्यानंतरच डिटेल्स देता येतील असं आरोग्यमंत्री सावंत म्हणाले.

नगरच्या रुग्णाला कशी झाली बाधा?

अहमदनगरमधील रुग्णाला H3N2 ची बाधा कशी झाली, यावरून तानाजी सावंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, अहमदनगर डॉ. विठ्ठलराव पाटील फाऊंडेशन मेडिकल कॉलेज येथील चंद्रकांत सपकाळ या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी त्याची परीक्षा संपल्यानंतर अलिबागला फिरायला आलेला होता. तो कँपसला परतल्यानंतर त्याला ताप आणि अंगदुखी होती. विद्यार्थ्यांनी अॅडमिट करायचा सल्ला दिला. आई-वडील दुसऱ्या दिवशी आले. दुसऱ्या दिवशी त्याला अॅडमिट केलं गेलं. 12 मार्चला त्यानंतर त्याला खासगी हॉस्पिटलला शिफ्ट केलं गेलं. साईदीप खासगी रुग्णालयात 13 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याला H3N2, कोव्हिड 19 आणि मेट्रोपॉलिस अशा अनेक आजारांमुळे मृत्यू झाला.

नागपूरचा मृत्यू कसा?

नागपूरमधील 72 वर्षांचे ए के माझी यांचा मृत्यू झाला. त्यांनाही वय आणि इतर गुंतागुंतीमुले मृत्यू झाला. 9 मार्च रोजी यांचा मृत्यू झाला.  या दोघांचाही मृत्यू H3N2 मुळेच झाला असं सध्या तरी म्हणता येणार नाही, मात्र H3N2 आणि कोविड तसेच इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचं दिसून येतंय.H3N2 हा मृत्यूपर्यंत नेणारा आजार नाही, असा प्राथमिक अहवाल आहे.

मात्र वाढत्या कोविड रुग्णांमुळे राज्यातील यंत्रणांना अलर्ट घोषित करण्यात आलंय. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत २४ तास सेवा उपलब्ध राहिल, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय. अनेक केंद्रांमध्ये टॅमी प्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना त्या देण्यात येतील, असेही सावंत यांनी सांगितले आहे.