AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची नको ती कमेंट, DM मध्ये सुनावले खडेबोल

Aishwarya Narkar: '... म्हणून लहान मुलं बिघडतात', ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची नको ती कमेंट... अभिनेत्री DM मध्ये नेटकऱ्यांची बोलतीच केली बंद..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या नारकर यांचीच चर्चा...

Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची नको ती कमेंट, DM मध्ये सुनावले खडेबोल
| Updated on: Mar 14, 2026 | 8:27 AM
Share

Aishwarya Narkar: मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत ऐश्वर्या यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. ऐश्वर्या नारकर फक्त रुपेरी पडद्यावरच नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या डान्सचे आणि काही विनोदी व्हिडीओ देखील पोस्ट करत असतात. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करतात. पण आता ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल करण्यात आलं आहे आणि त्यामागे कारण आहे त्यांचे कपडे… तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात… अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ज्यावर उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी नेटकऱ्यांची बोलतीच बंद केली आहे.

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या नारकर यांनी योगा करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी व्यायामासाठी सोयीस्कर असलेले कपडे घातले. पण त्यांच्या कपड्यांवरुन नेटकऱ्याने त्यांच्यावर निशाणा साधला. नेटकऱ्याच्या या कमेंटला दुर्लक्ष न करता ऐश्वर्या यांनी त्याची कमेंट नावासकट स्टोरीवर शेअर केली आहे.

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘निदान कॅमेऱ्या समोर तरी फूल कपडे घालून योगा करत जा मॅडम…’, यावर नारकर म्हणाल्या, ‘बुरसटलेले विचार सोडा… तुमचा फोकस का हलतोय…’, यावर नेटकरी म्हणाला, ‘याला तुम्ही बुरसटलेले विचार म्हणत असाल तर, तुमच्याअ अकलेची कीव करावीशी वाटते… व्हिडीओला व्ह्यूज वाढवण्यासाठी अशा कपड्यांमध्ये व्हिडीओ करताय…’

यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, ‘मुद्दा व्यायमाचाा आहे. कोणी काय कपडे घातले हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या वक्तव्यावरून तुमची अक्कल कळत आहे.’, पुढे नेटकरी म्हणाला, ‘कोणते कपडे घालायचे वैयक्तिक प्रश्न आहे. पण अशा कपड्यांमुळे मुलं बिघडतात…’

नेटकऱ्यांच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, ‘ त्यांना व्यायाम करायला शिकवा. म्हणजे विचारांचा समतोल येईल आणि त्यांचं डोकं शाबुत राहिल. नाहीतर तुमच्यासारखंच होणार मोठे होऊन.’, सर्व स्क्रिनशॉट ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या नारकर यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा सुरु आहे.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!