
Health : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे आपली स्किन डल आणि टॅन होताना दिसते. त्यासोबतच वाढत्या प्रदूषणामुळे देखील आपली स्किन मोठ्या प्रमाणात डल होते. त्यामुळे अनेकजण त्यांची डल स्किन घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे उपाय करूनही बहुतेक लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आज आपण अशा एका मुलतानी मातीच्या स्क्रबबाबत जाणून घेणार आहोत जो आपल्या स्किन वरील डलनेस आणि टॅनिंग दूर करेल.
मुलतानी मातीचा स्क्रब हा आपल्या चेहऱ्यावरील डलनेस दूर करून ग्लो आणण्याचं काम करतो. तसेच हा स्क्रब आपला चेहरा चमकदार बनवण्यास मदत करतो. त्यासोबतच आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन देखील या स्क्रबमुळे दूर होते. तर आता हा मुलतानी मातीचा स्क्रब कसा बनवायचा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
दोन चमचे मुलतानी माती
एक चमचा खोबरेल तेल
एक चमचा साखर
सगळ्यात आधी एक बाऊल घ्या आणि त्या बाऊलमध्ये दोन चमचे मुलतानी माती टाका. त्यानंतर त्यात एक चमचा खोबरेल तेल टाका सोबतच अर्धा चमचा साखर टाका. नंतर हे सर्व मिश्रण मिक्स करा, तर अशाप्रकारे आपला मुलतानी मातीचा स्क्रब तयार आहे.
हा पॅक लावण्या अगोदर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हा स्क्रब नीट लावून घ्या आणि हा स्क्रब दहा ते पंधरा मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करत साफ करा. त्यानंतर तुमचा चेहरा पाण्याने धुऊन घ्या आणि मग चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर किंवा क्रीम जरूर लावा.