Tips To Control Uric Acid: युरिक ॲसिड वाढल्यास घाबरून नका, अशा पद्धतीने करा कंट्रोल !

| Updated on: Sep 14, 2022 | 5:07 PM

पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची लेव्हल 4 - 6.5 या दरम्यान आणि महिलांमध्ये 3.5 - 6 पर्यंत नॉर्मल असते. जर युरिक ॲसिड लेव्हल या पेक्षा वाढली तर त्रास होऊ शकतो.

Tips To Control Uric Acid: युरिक ॲसिड वाढल्यास घाबरून नका, अशा पद्धतीने करा कंट्रोल !
युरिक ऍसिड
Image Credit source: Social Media
Follow us on

Easy Ways To Control Uric Acid: युरिक ॲसिड हे (Uric Acid) आपल्या शरीरातील टाकाऊ (waste) पदार्थांपैकी असते, जे लघवीद्वारे शरीराबाहेर जाते. जेव्हा कोणत्याही समस्येमुळे युरिक ॲसिडचे उत्पादन वाढते आणि ते शरीरातून बाहेर पडू शकत नाही, तेव्हा ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होते. त्यामुळे हाता-पायांच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. वाढत्या युरिक ॲसिडकडे बराच काळ दुर्लक्ष केल्यास किडनी (kidney problem) फेल्युअर होऊन वारंवार किडनी स्टोन्स होऊ शकतात. पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची लेव्हल 4 – 6.5 या दरम्यान आणि महिलांमध्ये 3.5 – 6 पर्यंत नॉर्मल असते. जर युरिक ॲसिड लेव्हल यापेक्षा वाढली तर त्रास होऊ शकतो. मात्र दैनंदिन जीवनात काही गोष्टींची नीट काळजी घेतल्यास युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्यासाठी काय उपाय करता येतील, ते जाणून घेऊया.

या 5 पद्धतीने युरिक ॲसिड ठेवा नियंत्रण –

  1. मासांहार करणे टाळा – युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे मांसाहारपासून दूर राहणे. सर गंगाराम रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमरेंद्र पाठक सांगतात की, नॉन व्हेज खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढण्याचा धोका वाढतो. याशिवाय डाळींचे मोठ्या प्रमाणात सेवन करणेही फायदेशीर ठरत नाही. युरिक ॲसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी खाण्या-पिण्यात सावधानता बाळगावी.
  2.  खूप पाणी प्या व साखरयुक्त पेयांचे सेवन टाळा – जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास शरीरातून युरिक ॲसिड बाहेर पडण्याची शक्यता वाढेल. पाण्यामुळे युरिक ॲसिड आपल्या शरीरात जमा होणार नाही. त्याशिवाय सोडा, कोल्ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि इतर साखरयुक्त पेय पिणे टाळावे. तुम्ही हेल्दी ड्रिंक्स पिऊ शकता.
  3.  रोज व्यायाम करावा- दररोज व्यायाम केल्याने युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जळजळ कमी होते आणि शरीराचे वजन प्रमाणात राहते. त्याशिवाय इन्सुलिन रेझिस्टंन्स सुधारते. दररोज सुमारे ३० मिनिटे व्यायाम केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.
  4.  बीअर व मद्यपान करू नये – हेल्थलाइनच्या अहवालानुसार, बिअर आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. त्यामुळे गाउटची समस्या वाढू शकते. ही समस्या टाळण्यासाठी बिअर आणि मद्यपान करणे पूर्णपणे सोडून देणे उत्तम ठरेल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. पुरेशी झोप घेणे आवश्यक – आतापर्यंत अनेक संशोधनातून ही माहिती समोर आली आहे की , जर तुम्हाला रोज 6-7 तास झोप मिळाली नाही तर शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. त्यामुळे रोज पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. त्याद्वारे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवू शकता.