Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण, 125 दिवसांतील नीच्चांक, कोरोनाबळींतही घट

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 374 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 45 हजार 254 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण, 125 दिवसांतील नीच्चांक, कोरोनाबळींतही घट
CORONA latest cases

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घसरण पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 8 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 30 हजार 93 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. हा गेल्या 125 दिवसांतील निचांकी आकडा आहे. तर एका दिवसात 374 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 374 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 45 हजार 254 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 3 लाख 53 हजार 710 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 14 हजार 482 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 6 हजार 130 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 41 कोटी 18 लाख 46 हजार 401 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 30,093

देशात 24 तासात डिस्चार्ज – 45,254

देशात 24 तासात मृत्यू – 374

एकूण रूग्ण – 3,11,74,322

एकूण डिस्चार्ज – 3,03,53,710

एकूण मृत्यू – 4,14,482

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,06,130

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 41,18,46,401

24 तासात लसीकरण झालेली संख्या – 52,67,309 

संबंधित बातम्या :

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण

(New 30093 Corona Cases in India in the last 24 hours)