AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण, कोरोनाबळींच्या संख्येतही घट

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 256 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 295 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 43 हजार 938 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण, कोरोनाबळींच्या संख्येतही घट
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 20, 2021 | 10:08 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 30 हजार 256 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 295 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 256 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 295 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 43 हजार 938 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 34 लाख 78 हजार 419 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 15 हजार 105 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 45 हजार 133 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 18 हजार 181 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 80 कोटी 85 लाख 68 हजार 144 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 30,256

देशात 24 तासात डिस्चार्ज – 43,938

देशात 24 तासात मृत्यू – 295

एकूण रूग्ण – 3,34,78,419

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,18,181

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,27,15,105

एकूण मृत्यू  – 4,45,133

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 80,85,68,144

गेल्या 24 तासातील लसीकरण – 37,78,296

देशभरातील 30,256 नव्या कोरोनाग्रस्तांपैकी केरळ राज्यात 19,653 रुग्ण सापडले आहेत. तर 295 कोरोनाबळींपैकी केरळातील 152 जणांना प्राण गमवावे लागले.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान