AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 102 दिवसांनी आकडे 40 हजारांच्या खाली

गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 566 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 907 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 56 हजार 994 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 102 दिवसांनी आकडे 40 हजारांच्या खाली
CORONA
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 10:03 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी घट झाली आहे. तब्बल 102 दिवसांनी नव्या कोरोनाग्रस्तांचे आकडे 40 हजारांच्या खाली आले आहेत. कालच्या दिवसात 37 हजार 566 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 907 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 37566 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 566 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 907 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 56 हजार 994 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 3 लाख 16 हजार 897 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 66 हजार 601 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 97 हजार 637 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 52 हजार 659 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण –37,566

देशात 24 तासात डिस्चार्ज – 56,994

देशात 24 तासात मृत्यू – 907

एकूण रूग्ण –  3,03,16,897

एकूण डिस्चार्ज – 2,93,66,601

एकूण मृत्यू –  3,97,637

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,52,659

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 32,90,29,510

एका दिवसातील लसीकरण – 52,76,457

संबंधित बातम्या :

कोरोना रोखण्यासाठी लस प्रभावी, मुंबईत दोन डोस घेतलेले फक्त 26 जण बाधित

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या भारतीयांना युरोप प्रवासासाठी कटकटी, पुनावाला म्हणाले टेन्शन मिटवणारच

(New 37566 Corona Cases in India in the last 24 hours)

माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.