AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या भारतीयांना युरोप प्रवासासाठी कटकटी, पुनावाला म्हणाले टेन्शन मिटवणारच

कोव्हिड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपियन युनियनने कोव्हीशील्डला वगळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरही युरोपीय संघाची मनमानी पाहायला मिळत आहे

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या भारतीयांना युरोप प्रवासासाठी कटकटी, पुनावाला म्हणाले टेन्शन मिटवणारच
अदर पूनावाला
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 12:25 PM
Share

पुणे : परदेशी जाणाऱ्या भारतीयांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. कोव्हिशील्ड (COVISHIELD) लस घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनमध्ये प्रवासासाठी अडचणी येत होत्या. यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन पुनावाला यांनी ट्विटरवरुन दिलं आहे. कोव्हिड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपियन युनियनने कोव्हीशील्डला वगळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरही युरोपीय संघाची मनमानी पाहायला मिळत आहे. (SII CEO Adar Poonawalla assures Indians who took Covishield Vaccine wont face problem while travelling European Union)

काय म्हणाले अदर पुनावाला?

“कोरोनावरील कोव्हिशील्ड लस घेतलेल्या बर्‍याच भारतीयांना युरोपियन युनियनमधील देशांमध्ये प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे मला समजले आहे. मी सर्वांना हमी देतो, की मी हे प्रकरण उच्च स्तरावर उचलून धरले आहे. संबंधित देशांसोबत नियामकासह राजनैतिक पातळीवरही लवकरच ही समस्या मिटण्याची आशा आहे.” असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं आहे. एक जुलैपासून युरोपियन देशांमध्ये डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट अंमलात आणण्याची तयारी आहे. त्यानुसार युरोपिय काम किंवा प्रवासाच्या निमित्ताने जगभर भ्रमंती करु शकतात.

‘कोव्हिशील्ड’ लसीबद्दल जाणून घ्या

‘कोव्हिशील्ड’ (covishield) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापराला जानेवारी महिन्यात भारतात मंजुरी मिळाली होती. ही भारतातील पहिली लस ठरली होतीऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका (Oxford AstraZeneca Coronavirus Vaccine) या कंपनीनं विकसित केलेली आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (Serum Institute of India) उत्पादित होणारी ‘कोव्हिशील्ड’ लस आहे. ‘कोव्हिशील्ड’ चाचण्यांदरम्यान 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. ‘कोव्हिशील्ड’चे दोन डोस घेण्यामध्ये 84 दिवसांचे अंतर सध्या ठेवले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट विरोधातील याचिका फेटाळली

दरम्यान, क्यूटीस या कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटविरोधात दाखल केलेली याचिका जानेवारी महिन्यात फेटाळण्यात आली होती. सीरमने कोव्हीशिल्ड लसीसाठी ट्रेडमार्क वापरल्याचा आरोप क्यूटीस कंपनीने केला होता. ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा क्यूटीस कंपनीने केला होता. त्यासाठी क्यूटीस कंपनीने पुणे जिल्हा न्यायालयात याचिका दाकल केली होती. याच याचिकेवर निकाल देताना दोन्ही वेगवेगळी उत्पादनं आहेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम होण्याचं कारण नाही, असं सांगत कोर्टाने याचिका फेटाळली होती.

संबंधित बातम्या :

कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

कोरोना लसीची किंमत कमी करा; केंद्र सरकारकडून सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

(SII CEO Adar Poonawalla assures Indians who took Covishield Vaccine wont face problem while travelling European Union)

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.