
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 42 हजार 909 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकट्या केरळमध्येच 29,836 नवे रुग्ण सापडले असून राज्यात 75 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कालच्या दिवसात देशात 380 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असून आता 3.76 लाखांच्या पार गेली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची धाकधूक वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 909 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 26 लाख 91 हजार 180 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 37 हजार 701 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 76 हजार 324 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 63 कोटी 43 लाख 81 हजार 358 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,909
देशात 24 तासात डिस्चार्ज – 34,763
देशात 24 तासात मृत्यू – 380
एकूण रूग्ण – 3,26,91,180
एकूण डिस्चार्ज – 3,19,23,405
एकूण मृत्यू – 4,37,701
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,76,324
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 63,43,81,358
गेल्या 24 तासातील लसीकरण – 31,14,696
भारत में पिछले 24 घंटे में #COVID19 के 42,909 नए मामले सामने आए। 34,763 लोग डिस्चार्ज हुए और 380 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई।
केरल में 24 घंटे में 29,836 नए मामले आए और 75 मृत्यु दर्ज़ हुई।
देश में कुल सक्रिय मामले: 3,76,324
कुल वैक्सीनेशन अब तक: 63.43 करोड़ pic.twitter.com/Ekn6TRdS3S
— ANI_HindiNews (@AHindinews) August 30, 2021
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय
दरम्यान, महाराष्ट्रात काल 4 हजार 666 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले, तर 131 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 510 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 3378, ठाण्यात 7283, तर पुण्यात 13 हजार 503 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
संबंधित बातम्या :
देशात तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय? नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ