कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात (बुधवारी) 5,031 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर तब्बल 216 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 60 लाखांवर जाऊ शकते, असा इशारा आरोग्य विभागाच्या अहवालातून देण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात कालच्या दिवसात 5,031 नवे कोरोनाबाधित सापडले. तर तब्बल 216 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर केरळातही देशातील रुग्णसंख्येच्या 68 टक्के रूग्ण सापडल्याने तिसरी लाट आल्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती काय?

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात (बुधवारी) 5,031 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर तब्बल 216 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 60 लाखांवर जाऊ शकते, असा इशारा आरोग्य विभागाच्या अहवालातून देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यू दरामध्ये किंचित वाढ होऊन 2.12 टक्क्यांवर गेली आहे. कोव्हिडसंबंधी नियमांचं पालन करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई महापालिका सज्ज

दरम्यान, मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. ही लाट रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य केंद्रे, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्ट्या, चाळी आणि अरुंद गल्ल्यांमध्ये फवारणी करुन त्या निर्जंतुक करण्याचा पालिकेचा प्लॅन आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येणार आहे.

केरळात देशातील 68 टक्के रुग्ण

दुसरीकडे, केरळानेही देशाची चिंता वाढवली आहे. केरळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. केरळात एका दिवसात 31 हजार 445 नवे रुग्ण सापडले. देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येच्या 68 टक्के रुग्ण केरळातून असल्याची माहिती आहे.

देशात काय स्थिती?

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली होती. म्हणजेच 37 हजार 593 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर एका दिवसात 648 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले होते.

संबंधित बातम्या :

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात उसळी, सक्रिय रुग्णसंख्याही पुन्हा वाढली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI