Organ Meat : मटणातील कलेजी,गुर्दा, भेजा आवडीने खाताय ? या लोकांनी सावधान राहावे, डॉक्टरांचा सल्ला
High Cholesterol Foods: बकऱ्याच्या मटणाच्या थाळीत अनेकदा कलेजी, भेजा आणि किडनी सारखे पदार्थ खवय्ये आवडीने रिचवतात. याला ऑर्गन मीट वा ऑफल म्हटले जाते. काही जण यास पोषणाचा खजाना मानतात.

Health Benefits And Risks Of Organ Meat: मटण खाणाऱ्यांच्या थाळीत कलेजी,भेजा, गुर्दा आणि हृदयासारख्या घटक असतात. याला ऑर्गन मीट वा ऑफल म्हटले जाते. अनेक लोकांना याचा स्वाद आवडतो. अनेक जण यास पोषणाचा खजाना म्हणतात. सत्य देखील हे आहे की या अवयवात व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. परंतू डॉक्टरांच्या मते मटणाचे हे अवयव प्रत्येकासाठी सुरक्षित असतातच असे नव्हे. काही लोकांसाठी याचे सेवन फायद्याच्या जागी नुकसान पोहचवू शकते.
कोणी काळजी घ्यावी ?
आरोग्याची माहिती देणारी वेबसाईट webmd च्या अनुसार मटणाची या घटकांचा फायदा असला तरी कलेजी, भेजा आणि गुर्दा रोज किंवा प्रमाणापेक्षा जास्त सेवन करु नये. बकऱ्याच्या कलेजी आणि हृदयात कोलेस्ट्रॉल जादा असते. जर कोणा व्यक्तीला आधाच कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा त्याला हृदयाचा आजार असेल तर धोका आहे.त्यामुळे जास्त प्रमाणात ऑर्गन मीट खाणे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची जोखीम वाढवते. याशिवाय ज्या लोकांना संधीवाताची समस्या असते. त्यांनी देखील कलेजी, गुर्दा वा इतर ऑर्गन मीटपासून अंतर राखावे. यात प्युरिनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरात युरिक एसिड वाढून सांधेदुखी आणि सूज सारखी समस्या होऊ शकते.
हीमोक्रोमॅटोसिस सारख्या आजाराने पिडीत लोकांनी देखील ऑर्गन मीट मर्यादित प्रमाणात खायला हवे. या आजारात शरीरात आधीच आयर्नचे प्रमाण जास्त असते. यामुळे जास्त आयर्न असलेले कलेजी सारखे पदार्थ नुकसान पोहचवू शकतात.
फिट लोकांनी काय करावे ?
जर तुम्ही संपूर्ण निरोगी असलात तरी ऑर्गन मीट रोजच्या आहाराचा भाग न बनवता कधी तरी आणि कमी प्रमाणात खावे. जर हृदयाचा आजार, हाय कोलेस्ट्रॉल, संधीवात वा आयर्न ओव्हरलोड सारखी समस्या असेल तर याला खाण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
कलेजी, गुर्दा आणि हृदयात व्हिटामिन्स बी-12, आयर्न, झिंक आणि बी-व्हिटामिन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्या लोकांमध्ये आयर्नची कमतरता असते त्यांनी मर्यादित प्रमाणात कलेजी खाण्यास हरकत नाही. यामुळे शरीरातील आयर्नची पातळी वाढून कमजोरी किंवा थकव्याची समस्या दूर होऊ शकते.
फायदेशीर देखील असते
कलेजीतील व्हिटामिन्स बी-1 आणि अन्य पोषक तत्वे मेंदूची काम करण्याच्या क्षमतेला आणखीन चांगली राखण्यास मदत करु शकतात. तसेच व्हिटामिन्स बी-2 शरीराच्या पेशींना आरोग्यदायी राखण्यासोबत कॅन्सरच्या धोक्यांना कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावते. याशिवाय कलेजी, हृदय आणि गुर्दा आढळणारी बी-१२ आणि फोलेट ब्लडमध्ये होमोसिस्टीच्या स्तराला नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊ शकतो.