AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes : ‘मधुमेहा’ वर रामबाण औषध! मधुमेहींनी कांदा खावा का? जाणून घ्या, कांद्याचे फायदे!

शुगर किंवा डायबेटीससाठी औषध: उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने उष्णता लागत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णांची साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

Diabetes : ‘मधुमेहा’ वर रामबाण औषध! मधुमेहींनी कांदा खावा का? जाणून घ्या, कांद्याचे फायदे!
Diabetes
| Updated on: Jun 03, 2022 | 11:53 PM
Share

मुंबई : मधुमेह (Diabetes) हा आज सामान्य आजारांपैकी एक बनला आहे. वास्तविक, आपल्या शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो. इन्सुलिन हा एक प्रकारचा हार्मोन आहे जो शरीराला ग्लुकोज शोषण्यास (To absorb glucose) मदत करतो. हा असा आजार आहे जो कधीही नष्ट होऊ शकत नाही आणि जर याला नियंत्रणात ठेवायचे असेल तर आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आता फळे आणि भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खाल्ल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रणात (Under control) राहते. यापैकी एक कांदा आहे, जो उन्हाळ्यात मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने उष्णता होत नाही आणि मधुमेहाच्या रुग्णांची साखरेची पातळीही नियंत्रणात राहते, असा समज आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, क्वेर्सेटिन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

साखरेची पातळी होते कमी

जर्नल फायटोफोरा थेरपीजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, आठ आठवड्यांसाठी दररोज 500 मिलीग्राम किंवा त्याहून अधिक क्वार्सेटिनचा डोस घेतल्याने मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे

कांदा ही भारतातील अशा भाज्यांपैकी एक आहे जी बहुतेक सर्व गोष्टींमध्ये वापरली जाते आणि यामध्ये चटण्या, घरगुती पदार्थ आणि सॅलड्सचा समावेश आहे. कांद्याच्या फायद्यांबद्दल बोलायचे तर, त्यात क्वेर्सेटिनचे प्रमाण खूप जास्त आहे. क्वेर्सेटिनमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, ज्यात अँटी-हिस्टामाइन गुणधर्म असतात. त्यामुळे कांद्यामध्ये असलेले क्वेर्सेटिन पेशींमध्ये बाहेर पडणाऱ्या ऍलर्जीन हिस्टामाइनला प्रतिबंध करते. एवढेच नाही तर कांदा उन्हाळ्यात त्वचेच्या ऍलर्जीपासून बचाव करतो. तसेच कांदा आपल्या शरीरात जळजळ होऊ देत नाही.

ऍलर्जी आणि रोगांपासून दूर ठेवते

मधुमेहा बाबत, आणखी एक अभ्यास समोर आला आहे जो उंदरांवर केला गेला होता. यामध्ये त्यांना सुमारे २८ दिवस कांद्याचे योग्य प्रमाणात सेवन करण्यात आले आणि त्यामुळे साखरेची पातळी खूपच नियंत्रित राहिल्याचे दिसून आले. कांद्यामध्ये क्वेर्सेटिन आणि सल्फर असल्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात कांद्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते त्यांना ऍलर्जी आणि रोगांपासून दूर ठेवते. त्यामुळे आहारात कांद्याचा समावेश करायला विसरू नका.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.