Helth : मान काळी पडली असेल तर दुर्लक्ष करू नका, असू शकतं ‘या’ आजारांचं लक्षण!

काही असे रोग असतात यामध्ये आपली त्वचा काळी तर होतेच पण त्यावर एक जाड थर देखील निर्माण होतो. तर आता मान काळी होण्याची इतर कोणती कारणे आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Helth : मान काळी पडली असेल तर दुर्लक्ष करू नका, असू शकतं या आजारांचं लक्षण!
Image Credit source: freepik
| Updated on: Oct 06, 2023 | 11:46 PM

मुंबई : बहुतेक लोकांची मान ही काळी असते. मळ साचल्यामुळे किंवा अस्वच्छतेमुळे किंवा टॅनिंगमुळे बहुतेक लोकांची मान ही काळी होते. तर मानेचा काळेपणा घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय देखील करतात. दररोज उन्हात फिरल्यामुळे टॅनिंग होऊन मान काळी होते. पण प्रत्येक वेळी टॅनिंग हे मान काळे होण्याचे कारण नसते. मान काळी होण्यामागे इतर कारणे देखील असू शकतात, जी तुमच्या आरोग्यास धोकादायक असू शकतात.

डायबिटीसची समस्या –  ज्या लोकांना अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स असते असे लोक इन्सुलिनला प्रतिरोधक असतात. तर इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तर मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये स्वादुपिंड इन्सुलिन हार्मोन योग्यरीत्या तयार करत नाही. तसेच हार्मोन नुसार इन्सुलिनच्या पेशी कार्य करू शकत नाहीत त्यामुळे मान काळी होण्याची शक्यता जास्त असते.

लठ्ठपणाची समस्या – ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या असते अशा लोकांमध्ये अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स हे दिसून येते. लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या लोकांच्या त्वचेवर अनेक थर तयार होतात. हे थर तयार झाल्यामुळे त्वचेमध्ये रंगद्रव्य निर्माण होतात. यामुळे बहुतेक लोकांची मानेची त्वचा काळी पडते. तर तुमची मान काळी पडली असेल तर डॉक्टरांकडे योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.

पीसीओडीची समस्या – बहुतेक मुलींना किंवा स्त्रियांना पीसीओडी ची समस्या असते. मुलींमध्ये हार्मोनल आरोग्य नीट नसले की त्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो. ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे अशा मुलींना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये मग इन्सुलिन रेजिस्टन्स सिंड्रोम चा धोका जास्त असतो. तर अशावेळी मुलींची मान काळी होऊ शकते. तर ज्यांची मान काळी झाली असेल त्यांनी डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे.