AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : Diabetes असणाऱ्या रुग्णांनी आहारात या 4 हिरव्या रसांचा आहारात समावेश, लगेच जाणवेल फरक!

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या आहारात इन्सुलिन वाढवणाऱ्या रसांचा समावेश करणे गरजेचे आहे. तर आता आपण हे रस कोणते आहेत याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

Health : Diabetes असणाऱ्या रुग्णांनी आहारात या 4 हिरव्या रसांचा आहारात समावेश, लगेच जाणवेल फरक!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 06, 2023 | 11:26 PM
Share

मुंबई : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताण-तणावामुळे, हेल्दी आहार न घेतल्यामुळे, बदलत्या वातावरणामुळे अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना मधुमेहाचा सामना करावा लागतो. आजकाल मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तर मधुमेह झाल्यानंतर त्या रुग्णांनी स्वतःची वेळीच काळजी घेणं गरजेचं असतं. नाहीतर अनेक धोकादायक आजारांचा सामना त्यांना करावा लागू शकतो. तर ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशांनी वेळोवेळी औषध घेणं, योग्य तो आहार घेणं गरजेचं असतं.

पालक हा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो. तर पालकाचा रस पिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पालकाचा रस खूप फायदेशीर ठरतो. हा रस पिल्यामुळे अशक्तपणा नाहीसा होतो तसेच प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. पालकाचा रस पिल्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांचे इतर समस्यांपासून देखील संरक्षण होते.

दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे दुधी भोपळ्याच्या रसाचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी दुधी भोपळ्याचा रस पिणे गरजेचे आहे. दुधी भोपळ्याच्या रसामुळे आपल्या हृदयाची स्थिती सुधारते तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रण राहण्यास मदत होते. दुधी भोपळ्याचा रस पिल्यामुळे शरीरातील जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दुधी भोपळ्याचा रस पिणे फायदेशीर ठरते.

कोरफड ही खूप गुणकारी असते, त्यामुळे कोरफडीचा रस हा मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडीचा रस पिल्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामध्ये विटामिन सी असते जे आपल्या रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच कोरफडीच्या रसामुळे पचनक्रिया देखील सुधारते, त्यामुळे कोरफडीचा रस पिण मधुमेह असल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असते.

Follow Us
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
पूराचं संकट! 2 लाखांहून अधिक लोकांना फटका, बचावकार्य सुरु
पूराचं संकट! 2 लाखांहून अधिक लोकांना फटका, बचावकार्य सुरु